लोकेश राहुलसह कुलदीप यादव
हरारे, 14 ऑगस्ट**:** झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी लोकेश राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ आज हरारेमध्ये दाखल झाला आहे. झिम्बाब्वे क्रिकेटनं हरारेतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय संघ दाखल झाल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. 18, 20 आणि 22 ऑगस्टला हरारे स्पोर्टस क्लबवर उभय संघातले हे वन डे सामने खेळवण्यात येणार आहेत. या व्हिडीओत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल आणि इतर भारतीय खेळाडू विमानतळावरुन बाहेर पडताना दिसत आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार लोकेश राहुल या दौऱ्याच्या निमित्तानं तब्बल सहा महिन्य़ांनी संघात पुनरागमन करणार आहे. फेब्रुवारीपासून लोकेश राहुलनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. दुखापतीमुळे त्याला मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकावं लागलं होतं. पण या दुखापतीतून सावरल्यानं राहुलचा पुन्हा संघात स्थान मिळालं आहे. इतकच नाही तर या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं आधी शिखर धवनला कर्णधारपदाची जबाबदारी दिली होती. पण राहुल फिट होताच त्याच्याकडेच कर्णधारपद सोपवण्यात आलं. तर धवन या वन डे मालिकेत उपकर्णधार असेल. राहुलची आशिया चषक संघात वर्णी या महिन्याच्या अखेरीस संयुक्त अरब अरब अमिरातीत (UAE) खेळवल्या जाणाऱ्या आशिया चषक स्पर्धेतही लोकेश राहुल भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. त्यामुळे या महत्वाच्या मालिकेआधी झिम्बाव्बे दौरा ही राहुलसाठी चांगली संधी ठरावी. झिम्बाब्वे दौऱ्यातल्या तीन वन डे सामन्यानंतर तो आशिया चषकासाठी यूएईला रवाना होईल. हेही वाचा - Kho Kho League: खो खोची ‘अल्टिमेट’ लीग, पाहा मराठी मातीतल्या खेळाचं नवं रुप… असा असेल भारताचा झिम्बाब्वे दौरा 18 ऑगस्ट – पहिली वन डे, हरारे स्पोर्टस क्लब 20 ऑगस्ट – दुसरी वन डे, हरारे स्पोर्टस क्लब 22 ऑगस्ट – तिसरी वन डे, हरारे स्पोर्टस क्लब मालिकेतले तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वा. सुरु होतील भारतीय संघ – लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर