JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup : सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी, रोहित टीममध्ये करणार एक बदल!

T20 World Cup : सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी, रोहित टीममध्ये करणार एक बदल!

टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 नोव्हेंबर : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. गुरूवार 10 नोव्हेंबरला ऍडलेडच्या मैदानात भारत-इंग्लंड यांच्यात सेमीफायनलची लढत होईल. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात 71 रननी दणदणीत विजय मिळवत टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली. टीम इंडियामध्ये बदल? झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताने टीममध्ये एक बदल केला. फॉर्ममध्ये नसलेल्या दिनेश कार्तिकऐवजी ऋषभ पंतला संधी देण्यात आली. आता सेमी फायनलमध्येही टीम इंडियात एक बदल होऊ शकतो. टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेल वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एक मॅच वगळता सगळ्या सामन्यांमध्ये खेळला, पण त्याला बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये यश मिळालं नाही. तसंच इंग्लंडच्या टीममध्ये डावखुरे बॅटर जास्त आहेत. डावखुऱ्या बॅटरना डावखुऱ्या स्पिनरचा सामना करणंही सोपं जातं, त्यामुळे सेमी फायनलमध्ये अक्षर पटेलला डच्चू दिला जाऊ शकतो. सेमी फायनलसाठी ‘हे’ नवे नियम लागू, पाऊस आल्यास पाहा कशी होणार विजेत्याची घोषणा कोणाला संधी? अक्षर पटेलला वगळलं तर रोहितकडे दीपक हुड्डा आणि हर्षल पटेल आणि युझवेंद्र चहल ते तीन पर्याय शिल्लक आहेत, यापैकी हुड्डा किंवा हर्षल पटेल यांच्यापैकी एकाचा विचार रोहित करू शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही रोहितने अक्षर पटेलऐवजी हुड्डाला खेळवलं होतं, पण हुड्डा शून्य रनवर आऊट झाला होता. सेमी फायनलमध्ये हुड्डाची निवड केली तर रोहितकडे बॉलिंगसाठी 5 पर्यायच शिल्लक राहतात. दुसरीकडे हर्षल पटेलही खालच्या क्रमांकावर बॅटिंग करू शकतो, तसंच तो फास्ट बॉलरही आहे, त्यामुळे रोहित शर्मा कुणाला संधी देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भारतीय टीम रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर.अश्विन, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल 15 साल बाद… टी20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा होणार भारत-पाकिस्तान फायनल?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या