अॅडलेड, 06 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप मध्ये पुन्हा एकदा महामुकाबला रंगण्याची शक्यता आहे. याचं कारण भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ यंदाच्या टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे 2007 नंतर तब्बल 15 वर्षांनी या दोन्ही टीम फायनलमध्ये खेळण्याचा योग जुळून आला आहे. पण त्यासाठी दोन्ही संघांना इंग्लंड आणि न्यूझीलंडचा अडथळा पार करावा लागणार आहे. 2007 मध्ये पहिल्यावहिल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान मुकाबला रंगला होता. टीम इंडियानं ती मॅच जिंकून विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं. पण त्यांतर एकदाही भारतीय संघ टी20 वर्ल्ड कप जिंकू शकलेला नाही. दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का आज सकाळी अॅडलेडच्या मैदानात नेदरलँडला हरवून सेमी फायनल गाठण्याच्या निर्धारानं दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरला होता. भारतासारख्या टीमला हरवल्यामुळे दक्षिण आफ्रिका या मॅचमध्ये हॉट फेव्हरेट मानली जात होती. पण नेदरलँडनं दिलेलं 158 धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेला पेलवलं नाही आणि त्याना अवघ्या 145 धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकन संघासाठी हा मोठा धक्का आहे. कारण यंदा दक्षिण आफ्रिकेला विजेतेपदाचे दावेदार मानलं जात होतं. पण त्यांचा वर्ल्ड कपमधला प्रवास सुपर 12 फेरीतूनच धक्कादायकरित्या संपुष्टात आला. पण त्याचा फायदा पाकिस्तानला झाला.
WHAT A WIN! 🤩
— ICC (@ICC) November 6, 2022
Netherlands defeat South Africa in their final Group 2 match of #T20WorldCup#SAvNED |📝: https://t.co/4UJVijHlTA pic.twitter.com/zhmHSOpqVe
हेही वाचा - Cricket: वर्ल्ड कप खेळलेल्या ‘या’ खेळाडूवर बलात्काराचा आरोप, सिडनीत अटक; पाहा काय आहे प्रकरण? पाकिस्तानचं नशीब फळफळलं यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि त्यानंतर झिम्बाब्वेकडून पराभव स्वीकारावा लागल्यानं पाकिस्तानचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं होतं. पण दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचा सामना पावसामुळे वाया गेला. त्यानंतर आज सकाळी नेदरलँडनं दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला. त्यामुळे पाकिस्तानचं नशीब पालटलं आणि सेमी फायनलचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले झाले. पाकिस्ताननं टी20 वर्ल्ड कपची सहाव्यांदा सेमी फायनल गाठली आहे.
13 नोव्हेंबरला मेगा फायनल? 13 नोव्हेंबरला टी20 वर्ल्ड कपची फायनल रंगणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर अंतिम फेरीचा हा सामना खेळवला जाईल. पण त्याआधी 9 आणि 10 नोव्हेंबरला सिडनीत सेमी फायनलचे सामने होणार आहेत. भारतीय संघानं झिम्बाब्वेला हरवल्यास भारत वि. इंग्लंड आणि न्यूझीलंड वि. पाकिस्तान अशा सेमी फायनलच्या लढती होतील. आणि जर भारत आणि पाकिस्ताननं आपापल्या लढती जिंकल्या तर वर्ल्ड कपच्या मैदानात 15 वर्षांनी क्रिकेट चाहत्यांना एक मेगा फायनल पाहायला मिळेल.