JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / SMAT20: अखेर करुन दाखवलं... अजिंक्य रहाणेच्या मुंबईनं 13 वर्षांनी पूर्ण केलं 'ते' स्वप्न

SMAT20: अखेर करुन दाखवलं... अजिंक्य रहाणेच्या मुंबईनं 13 वर्षांनी पूर्ण केलं 'ते' स्वप्न

SMAT20: मुंबईकरांना सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेची ट्रॉफी सारखी हुलकावणी देत होती. पण यंदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईच्या टीमनं ती ट्रॉफीही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या खजिन्यात जमा केली आहे.

जाहिरात

मुंबईनं जिंकली मुश्ताक अली ट्रॉफी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता, 05 नोव्हेंबर: डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईकरांचा चांगलाच दबदबा आहे. रणजी ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत तर मुंबईच्या जवळपासही कुणी नाही. मुंबईनं तब्बल 41 वेळा रणजी ट्रॉफी उंचावली आहे.  इराणी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि इतर देशांतर्गत स्पर्धांमध्ये  मुंबईचं नाणं नेहमीच खणखणीत वाजलंय. पण एका स्पर्धेत मात्र मुंबईकरांना विजेतेपद सारखी हुलकावणी देत होतं. ती होती सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धा. पण यंदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईच्या टीमनं ती ट्रॉफीही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या खजिन्यात जमा केली आहे.

मुंबईकडे मुश्ताक अली ट्रॉफी 2009 पासून आतापर्यंत मुंबईला एकदाही मुश्ताक अली टी20 स्पर्धा जिंकता आली नव्हती. पण यंदा एमसीएनं अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात एक तगडा संघ मैदानात उतरवला. या टीममध्ये कॅप्टन रहाणेसह पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शिवम दुबे हे आंतरराष्ट्रीय खेळाडू तर त्यांच्या जोडीला युवा यशस्वी जैसवाल, सरफराज खान, शम्स मुलानीसारख्या युवा खेळाडूंचा समावेश होता. एकेक करत रहाणेच्या या पलटननं मुश्ताक अली टी20 स्पर्धेची फायनल गाठली कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर हिमाचल प्रदेशला 3 विकेट्सनी हरवून विजेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरलं.

हेही वाचा -  Ind vs Zim: ‘सुपर संडे’ला पहाटे 5.30 पासून सामने, भारत-झिम्बाब्वे मॅच ‘या’ वेळेत होणार सुरु हिमाचलवर सनसनाटी मात अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या फायनलमध्ये हिमाचलनं मुंबईला विजयासाठी चांगलच झुंजवलं. ऋषी धवनच्या हिमाचलनं या सामन्यात मुंबईसमोर 144 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण तगडी फलंदाजी असतानाही मुंबईला विजयासाठी झुंजावं लागलं. श्रेयस अय्यरनं 34 धावा केल्या तर सरफराजनं 36 धावांची खेळी करत मुंबईला विजेतेपदाचं दार उघडून दिलं. मुंबईनं हा सामना 3 विकेट्सनी जिंकून एक नवा इतिहास घडवला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या