फिफा वर्ल्ड कपमध्ये महिला रेफ्री
दोहा-कतार, 30 नोव्हेंबर: कतारमध्ये सध्या फुटबॉल वर्ल्ड कप सुरु आहे. सध्या साखळी फेरीचे सामने सुरु असून काही गटात बाद फेरीचे संघ निश्चित झाले आहेत. पण याचदरम्यान गुरु मात्र फिफा वर्ल्ड कपच्या आजवरच्या इतिहासातला महत्वाचा दिवस असणार आहे. कारण आजपर्यंत पुरुषांच्या फुटबॉलमध्ये कधीही महिला रेफ्री मैदानात दिसली नव्हती. पण शुक्रवारी जर्मनी आणि कोस्टा रिका यांच्यातल्या सामन्यात एक महिला रेफ्री मैदानात दिसणार आहे. फिफा वर्ल्ड कपच्या गेल्या 92 वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे. स्टेफानी फ्रॅपार्ट मुख्य रेफ्री या सामन्यासाठी फ्रान्सची स्टेफानी फ्रॅपार्ट मुख्य रेफ्री असणार आहे. तर इतर दोन सहाय्यक रेफ्रीही महिला असणार आहेत. फिफानं मंगळवारी याबाबत अधिकृत घोषणा केली.
कोण आहे स्टेफानी फ्रॅपार्ट? 38 वर्षांच्या फ्रॅपार्टनं युरोपियन फुटबॉलमध्ये रेफ्री म्हणून आपली कारकीर्द घडवली आहे. गेल्या काही वर्षात तिनं अनेक मोठ्या सामन्यांमध्ये रेफ्री म्हणून काम पाहिलं आहे. 2019 साली फ्रान्सच्या लीग 1 फुटबॉल टूर्नामेंटमध्ये रेफ्री म्हणून काम करणारी ती पहिलीच महिला ठरली होती. याच वर्षी तिनं लिव्हरपूल आणि चेल्सीदरम्यानच्या सामन्यात रेफ्रींग केलं होतं. त्यानंतर 2020 साली चॅम्पियन्स लीग आणि फ्रेंच कपच्या फायनलमध्येही फ्रॅपार्ट रेफ्री होती. हेही वाचा - Vijay Hajare Trophy: महाराष्ट्राचं रनमशिन… वर्ल्ड रेकॉर्डनंतर पठ्ठ्यानं अवघ्या तीन दिवसात ठोकलं दुसरं शतक दरम्यान कोस्टा रिका आणि जर्मनीतल्या सामन्यात रवांडाची सलीमा मुकान्सांगा आणि जपानची योशिमी यामाशिता या सहाय्यक रेफ्री म्हणून काम पाहणार आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकूण 36 रेफ्रींची फिफानं नियुक्ती केली आहे.