JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी दिल्लीच्या 'या' खेळाडूची होऊ शकते निवड, रोहितला मिळू शकतो डच्चू

टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी दिल्लीच्या 'या' खेळाडूची होऊ शकते निवड, रोहितला मिळू शकतो डच्चू

आयपीएल (IPL 2022) सुरु होण्यापूर्वी टीम इंडियामध्ये (Team India) मोठ्या घडामोडी घडल्या. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला (Rohit Sharma) तिन्ही फॉरमॅटमध्ये नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेक दिग्गज खेळाडूंचे पत्तेही संघातून कापण्यात आले. पण रोहितचे वय 34 पाहता हा खेळाडू वर्षानुवर्षे टीम इंडियाचा कर्णधार बनू शकेल असे वाटत नाही. याशिवाय बीसीसीआय रोहितकडून कोणत्याही एका फॉरमॅटचे कर्णधारपद हिरावून दुसऱ्या खेळाडूला देऊ शकते.

जाहिरात

Rishabh Pant & Rohit Sharma

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 मार्च: आयपीएल (IPL 2022) सुरु होण्यापूर्वी टीम इंडियामध्ये (Team India) मोठ्या घडामोडी घडल्या. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला (Rohit Sharma) तिन्ही फॉरमॅटमध्ये नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेक दिग्गज खेळाडूंचे पत्तेही संघातून कापण्यात आले. पण रोहितचे वय 34 पाहता हा खेळाडू वर्षानुवर्षे टीम इंडियाचा कर्णधार बनू शकेल असे वाटत नाही. याशिवाय बीसीसीआय रोहितकडून कोणत्याही एका फॉरमॅटचे कर्णधारपद हिरावून दुसऱ्या खेळाडूला देऊ शकते. विशेष म्हणजे रोहित शर्माची जागा घेण्यासाठी एक खेळाडू सज्ज आहे. जर हा खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार झाला तर तो रोहितपेक्षा चांगले निर्णय घेऊ शकेल. अशी चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे. 24 वर्षीय युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) या खेळाडूचे नाव सध्या चर्चेत आले आहे. IPL 2022 : पहिल्याच मॅचमध्ये Monster Six मारणारा RCB चा 22 वर्षांचा खेळाडू कोण आहे? तमध्ये एवढी ताकद आहे की तो आगामी काळात टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो. तो रोहित शर्मापेक्षा चांगले निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो. असे क्रिकेटच्या वर्तुळात बोलले जात आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात त्याने घेतलेले निर्णय योग्य ठरले. जिथे पंतच्या संघाने रोहितच्या मुंबईचा आरामात पराभव केला. गेले दोन वर्षे झाले पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करत आहे. गेल्या मोसमात या खेळाडूच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ अव्वल ठरला. IPL 2022: दोन भावात आज होणार काट्याची टक्कर, या टीमला 3 वेळा बनवले चॅम्पियन त्याचबरोबर यंदाही रोहितसारख्या कर्णधारावर पंतचे पारडे जड दिसत आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 5 गडी राखून पराभव केला. या संघाला सामना जिंकण्यात कोणतीही अडचण आली नाही आणि सामना सहज जिंकला. पंतला भारताचा नवा कर्णधार बनवायला हवे, असे स्वतः दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंगचे मत आहे. रोहित विराटपेक्षा एक वर्षांनी मोठा रोहितचे वय 34 पाहता हा खेळाडू वर्षानुवर्षे टीम इंडियाचा कर्णधार बनू शकेल असे वाटत नाही. तो विराट कोहलीपेक्षा एक वर्षांनी मोठा आहे. या वयात खेळाडूंच्या फिटनेससंदर्भात तक्रारी सुरु होतात. त्यामुळे ते यावेळी निवृत्तीचे नियोजन करू लागतात. 7-8 वर्षांच्या दीर्घ कालावधीचा विचार केल्यास रोहितला नवा कर्णधार बनवता येणार नाही. अशा स्थितीत काही वर्षांनी टीम इंडियासाठी नव्या कर्णधाराचा शोध घेतला जाणार आहे. अशा परिस्थितीत ऋषभ पंत हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. असे क्रिकेट जगतात म्हटले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या