Home /News /sport /

IPL 2022 : Mumbai Indians च्या 14 मॅच, वेळ आणि तारीख, पाहा एका क्लिकवर

IPL 2022 : Mumbai Indians च्या 14 मॅच, वेळ आणि तारीख, पाहा एका क्लिकवर

आयपीएल 2022 च्या वेळापत्रकाची (IPL Schedule 2022) अखेर बीसीसीआयने (BCCI) घोषणा केली आहे. सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सामन्याला 27 तारखेपासून सुरूवात होणार आहे.

  मुंबई, 6 मार्च : आयपीएल 2022 च्या वेळापत्रकाची (IPL Schedule 2022) अखेर बीसीसीआयने (BCCI) घोषणा केली आहे. 26 मार्चपासून आयपीएलच्या 15 व्या मोसमाला सुरूवात होणार आहे, तर स्पर्धेची फायनल 29 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात टीमची 2 ने वाढून 10 झाली आहे, तरीही प्रत्येक टीम दरवर्षी प्रमाणेच 14 सामने खेळणार आहे. या 10 टीमना 5-5 च्या ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. ग्रुप ए मध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स या टीम आहेत, तर ग्रुप बी मध्ये चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, पंजाब किंग्स आणि गुजरात जाएंट्स यांचा समावेश आहे. ग्रुप ए मधल्या 5 टीम एकमेकांविरुद्ध 2 वेळा खेळणार आहेत, तर ग्रुप बी मधल्या एका टीमविरुद्ध दोनदा आणि उरलेल्या 4 टीमविरुद्ध एकदा खेळणार आहे. सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सामन्याला 27 तारखेपासून सुरूवात होणार आहे. मुंबईचा पहिलाच सामना दिल्लीविरुद्ध (Mumbai Indians vs Delhi Capitals) होणार आहे. मुंबईची टीम 14 पैकी वानखेडे स्टेडियमवर 4 मॅच, डी.वाय.पाटील स्टेडियमवर 4 मॅच, ब्रेबॉर्नवर 3 मॅच, पुण्यात 3 मॅच खेळणार आहे. कोरोना व्हायरस आणि कठोर बायो-बबलच्या नियमामुळे विमान प्रवास टाळण्यासाठी यावर्षी ग्रुप स्टेजच्या 70 मॅच मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न, नवी मुंबईतील डीवाय पाटील आणि पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. IPL Schedule 2022 : CSK vs KKR सामन्याने आयपीएलला सुरूवात, असं आहे संपूर्ण वेळापत्रक आयपीएल सामन्यांसाठी 25 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये यायची परवानगी महाराष्ट्र सरकारने दिली आहे. प्ले-ऑफचे सामने कुठे खेळवले जातील, याबाबत मात्र अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, पण हे चारही सामने गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होतील, असा अंदाज आहे.
  तारीखमॅचठिकाणवेळ
  27 मार्चदिल्ली विरुद्ध मुंबईब्रेबॉर्न स्टेडियमदुपारी 3.30 वाजता
  2 एप्रिलमुंबई विरुद्ध राजस्थानडी.वाय.पाटील स्टेडियमदुपारी 3.30 वाजता
  6 एप्रिलकोलकाता विरुद्ध मुंबईएमसीए स्टेडियम, पुणेसंध्याकाळी 7.30 वाजता
  9 एप्रिलबँगलोर विरुद्ध मुंबईएमसीए स्टेडियम, पुणेसंध्याकाळी 7.30 वाजता
  13 एप्रिलमुंबई विरुद्ध पंजाबएमसीए स्टेडियम, पुणेसंध्याकाळी 7.30 वाजता
  16 एप्रिलमुंबई विरुद्ध लखनऊब्रेबॉर्न स्टेडियमदुपारी 3.30 वाजता
  21 एप्रिलमुंबई विरुद्ध चेन्नईडी.वाय.पाटील स्टेडियमसंध्याकाळी 7.30 वाजता
  24 एप्रिललखनऊ विरुद्ध मुंबईवानखेडे स्टेडियमसंध्याकाळी 7.30 वाजता
  30 एप्रिलराजस्थान विरुद्ध मुंबईडी.वाय. पाटील स्टेडियमसंध्याकाळी 7.30 वाजता
  6 मेगुजरात विरुद्ध मुंबईब्रेबॉर्न स्टेडियमसंध्याकाळी 7.30 वाजता
  9 मेमुंबई विरुद्ध कोलकाताडी.वाय.पाटील स्टेडियमसंध्याकाळी 7.30 वाजता
  12 मेचेन्नई विरुद्ध मुंबईवानखेडे स्टेडियमसंध्याकाळी 7.30 वाजता
  17 मेमुंबई विरुद्ध हैदराबादवानखेडे स्टेडियमसंध्याकाळी 7.30 वाजता
  21 मेमुंबई विरुद्ध दिल्लीवानखेडे स्टेडियमसंध्याकाळी 7.30 वाजता
  अशी आहे मुंबईची टीम रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल, इशान किशन, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अर्षद खान, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, बसील थंपी
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: Ipl 2022, Mumbai Indians

  पुढील बातम्या