शार्दूल ठाकूर
मुंबई, 14 नोव्हेंबर: आयपीएलची रिटेन्शन विंडो बंद होण्यास आता अवघे काही तास उरले आहेत. पण त्याआधी कोलकाता नाईट रायडर्सनं एक मोठा हात मारला आहे. 2022 च्या आयपीएल सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या शार्दूल ठाकूरला कोलकात्यानं ट्रेड केलं आहे. त्यामुळे ‘पालघर एक्स्प्रेस’ आता दिल्लीहून कोलकात्याकडे रवाना होणार आहे. सध्या शार्दूल ठाकूर न्यूझीलंड दौऱ्यावरच्या भारतीय संघात आहे. शार्दूलसाठी सीएसकेचा डाव? गेल्या वर्षी शार्दूलला दिल्ली कॅपिटल्सनं 10.75 कोटी रुपये देऊन खरेदी केलं होतं. पण आता मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स दिल्लीशी ट्रेडमार्फत शार्दूलला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी उत्सुक होते. पण अखेर कोलकात्यानं बाजी मारली.
आयपीएलमध्ये शार्दूल ठाकूरची कामगिरी आयपीएल 2022 मध्ये शार्दूलनं दिल्लीकडून खेळताना 14 मॅचमध्ये 15 विकेट्स घेतल्या होत्या. 2015 पासून आयपीएल खेळणाऱ्या शार्दूलनं आतापर्यंत 75 मॅचमध्ये 82 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं आतापर्यंत 4 वेगवेगळ्या फ्रँचायझीजकडून आयपीएल खेळलं आहे. 2015 आणि 2016 मध्ये शार्दूल पंजाब किंग्स संघात होता. त्यानंतर 2017 साली तो पुणे सुपरजायंट्समधून खेळला. तिथून धोनीनं शार्दूलला आपल्या टीममध्ये घेतलं. 2018 ते 2021 हे चार सीझन शार्दूल सीएसकेमध्ये होता. पण यावर्षी त्याला दिल्ली कॅपिटल्सनं 10.75 कोटींमध्ये विकत घेतलं होतं. हेही वाचा - Team India: टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं पुढचं मिशन कोणतं? पाहा संपूर्ण शेड्यूल कोलकात्यानं मारला मोठा हात दरम्यान मंगळवारी ट्रेडिंग विंडो बंद होण्याआधी कोलकाता नाईट रायडर्सनं मोठा हात मारला आहे. केकेआरनं आतापर्यंत शार्दूलसह गुजरातकडून लॉकी फर्ग्युसन आणि रेहमतुल्ला गुरबाजला ट्रेड करुन आपल्या टीममध्ये घेतलं आहे.
23 डिसेंबरला मिनी ऑक्शन कोची येथे येत्या 23 डिसेंबरला आयपीएलचं मिनी ऑक्शन पार पडणार आहे. आता ज्या खेळाडूंना रिलीज करण्यात येईल त्यांचा या ऑक्शनमध्ये समावेश होणार आहे. या खेळाडूंच्या फायनल लिस्टसाठी मंगळवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.