मुंबई, 14 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधला पराभव विसरुन टीम इंडिया आता एका नव्या मिशनसाठी सज्ज झाली आहे. हार्दिक पंड्या आणि शिखर धवन यांच्या नेतृत्वात भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये आता टी20 आणि वन डे मालिका खेळणार आहे. वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंड दौऱ्याचा भाग नसलेले खेळाडू मायदेशी रवाना झाले. तर इतर खेळाडू वेलिंग्टनमध्ये दाखल झाले आहेत. येत्या 18 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड संघात टी20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर उभय संघात वन डे मालिकाही होणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध दौऱ्यात टीममध्ये बदल
भारताचा हा न्यूझीलंड दौरा भविष्याच्या दृष्टीनं नवी सुरुवात असेल. कारण टी20 चा पुढचा कर्णधार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या हार्दिक पंड्याकडे न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. हार्दिकनं याआधीही टी20चं कर्णधारपद भूषवलं आहे. पण वर्ल्ड कपमधल्या भारतीय संघाच्या अपयशानंतर हार्दिककडे आता नियमित टी20 कर्णधारपद दिलं जाण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया 3 टी20 सामने खेळणार आहे. त्यानंतर 3 सामन्यांची वन डे मालिकाही खेळवली जाईल.
Hello Wellington 👋 @HoodaOnFire pic.twitter.com/iFd3T100Pu
— Mohammed Siraj (@mdsirajofficial) November 13, 2022
धवन वन डेचा कर्णधार
टी20 नंतर होणाऱ्या वन डे मालिकेसाठी शिखर धवन टीम इंडियाचा कॅप्टन असेल. 25 नोव्हेंबरला ऑकलंडमध्ये मालिकेतील पहिला वन डे सामना खेळवण्यात येईल.
हेही वाचा - T20 World Cup: ग्रेट कमबॅक! गेल्या वर्षी वर्ल्ड कपमध्ये कॉमेंटेटर, यंदा बनला चक्क प्लेयर ऑफ द टूर्नामेंट
असा असेल भारताचा न्यूझीलंड दौरा
18 नोव्हेंबर, पहिली टी20 - वेलिंग्टन
20 नोव्हेंबर, दुसरी टी20 - माऊंट माँगानुई
22 नोव्हेंबर, तिसरी टी20 - नेपियर
वन डे मालिका
25 नोव्हेंबर, पहिली वन डे - ऑकलंड
27 नोव्हेंबर, दुसरी वन डे - हॅमिल्टन
30 नोव्हेंबर, तिसरी वन डे - ख्राईस्टचर्च
हेही वाचा - T20 World Cup: पाकिस्तान हरली पण कुणामुळे? पाहा टी20 वर्ल्ड कप फायनलचा टर्निंग पॉईंट
भारताचा टी20 संघ - हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), ईशान किशन, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
भारताचा वन डे संघ - शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, कुलदीप सेन, अर्शदीप, शार्दूल ठाकूर, दीपक चहर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Sports, T20 world cup 2022