JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पुरुष संघासोबत खेळत असल्यासारखं वाटतं, ऑस्ट्रेलियन महिला टीमबद्दल शेफालीचं वक्तव्य

पुरुष संघासोबत खेळत असल्यासारखं वाटतं, ऑस्ट्रेलियन महिला टीमबद्दल शेफालीचं वक्तव्य

भारताविरुद्धच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3 पैकी दोन सामने जिंकून आघाडी घेतली आहे. टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन असलेला ऑस्ट्रेलियाचा महिला संघ बलाढ्य असा आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलियी महिला संघांच्या पाच सामन्यांची टी 20 मालिका सध्या सुरू आहे. भारताविरुद्धच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3 पैकी दोन सामने जिंकून आघाडी घेतली आहे. टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन असलेला ऑस्ट्रेलियाचा महिला संघ बलाढ्य असा आहे. या संघाबाबत भारताची युवा बॅटर शेफाली वर्माने ऑस्ट्रेलियाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शेफालीने म्हटलं की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना वाटतं की एखाद्या पुरुष संघाविरुद्ध सामना सुरू आहे. शेफालीने वयाच्या 15 व्या वर्षी भारताकडून पदार्पण केलं असून भारताच्या स्मृती मानधनासोबत ती महिला क्रिकेटमध्ये सर्वात आक्रमक अशी सलामीची जोडी बनवली आहे. पहिल्या दोन सामन्यात तिला फारशी चमक दाखवता आली नाही. पण तिसऱ्या सामन्यात तिने 41 चेंडूत 52 धावांची खेळी केली होती. यात 6 चौकार आणि 3 षटकार मारले होते. हेही वाचा :  BCCI अडचणीत, वर्ल्ड कपचे यजमानपद ICC घेणार काढून? ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या टी20 सामन्याआधी बोलताना शेफालीने म्हटलं की, मला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणं आवडतं. असं वाटतं की पुरुष संघाविरुद्ध खेळथ आहे. जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौकार मारते तेव्हा माझा आत्मविश्वास वाढतो आणि मला वाटतं की मी एक खेळाडू म्हणून सुधारणा केली आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ हा सर्वोत्तम आहे. हेही वाचा : फायनलआधी मेस्सीच्या दुखापतीने वाढवली अर्जेंटिनाचा चिंता, सरावाला न आल्याने चर्चा

 इंग्लंड किंवा इतर संघाविरोधात खेळताना इतका आनद होत नाही जितका ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना होतो. त्यांच्यासोबत खेळताना पुरुष संघासोबत खेळल्यासारखं वाटतं कारण त्यांचा खेळच तसा आहे. जर तुमची लहान चूक जरी त्यांना समजली तरी ते त्याचा फायदा घेतात. त्यामुळे आम्हाला त्यांच्याविरुद्ध सर्वोत्तम खेळ खेळायचा असतो असं शेफालीने म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या