मुंबई, 17 डिसेंबर : फिफा वर्ल्ड कप 2022 चा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेतील हा अंतिम सामना अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात होणार आहे. दरम्यान, अर्जेंटिनाचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. क्रोएशियाविरुद्ध झालेल्या सेमीफायनलमध्ये मेस्सीला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला होता. गुरुवारी मेस्सी सरावालासुद्धा उतरला नव्हता. त्यामुळे आता मेस्सी फायनलमध्ये खेळणार की नाही यामुळे चाहत्यांमध्येही चिंता आहे. क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यावेळी मेस्सी विचित्र पद्धतीने मैदानातून बाहेर गेला होता. त्यावेळी हॅमस्ट्रिंग धरून चालत होता. यानंतर अनेकदा मेस्सी आपल्या पायाला दाबत असताना दिसला. तेव्हा त्याला जास्त त्रास जाणवत होता. हेही वाचा : Arjun Tendulkar साठी खास पोस्ट लिहिणारी मैत्रीण Danielle Wyatt आहे तरी कोण? पाहा VIDEO मेस्सीच्या दुखापतीबाबत अधिकृतपणे अर्जेंटिनाच्या संघाकडून काही माहिती देण्यात आलेली नाही. पण अर्जेंटिनाचा गोलकीपर एमिलियानो मार्टिनेजने मेस्सीला दुखापत झाली नसल्याचं म्हटलंय. आम्ही नेदरलँडविरुद्ध सामना 120 मिनिटे खेळला. तो खूप कठीण सामना होता पण तुम्हाला दिसेल की त्याला प्रत्येक सामना संपवायचा असतो. मेस्सीच्या दुखापतीबाबत अर्जेंटिनाच्या संघाने काही माहिती दिली नसली तरी तो फायनलच्या सामन्यात खेळणार आहे. तो शुक्रवारी सरावासाठी मैदानावर आला नसला तरी अंतिम सामन्यात तो खेळेल. त्याने फायनलआधी विश्रांती घेतली असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.