जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / BCCI अडचणीत, वर्ल्ड कपचे यजमानपद ICC घेणार काढून?

BCCI अडचणीत, वर्ल्ड कपचे यजमानपद ICC घेणार काढून?

न्यूझीलंड दौऱ्यासाठी होणार टीम इंडियाचं सिलेक्शन

न्यूझीलंड दौऱ्यासाठी होणार टीम इंडियाचं सिलेक्शन

बीसीसीआयने आयसीसीला याबाबतीत काही होऊ शकणार नाही अशी माहिती दिली असल्याचे समजते. त्यामुळे आयसीसीला वाटले तर ते स्पर्धा भारतातून बाहेर खेळवू शकतात असंही बीसीसीआयकडून सांगण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 डिसेंबर : आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चे आयोजन भारतात होणार आहे. मात्र भारताकडून वर्ल्ड कपचे यजमानपद काढून घेतले जाऊ शकते. हे प्रकरण कराशी संबंधित आहे. भारत सरकारसोबत बीसीसीआय़ ही अचडण दूर करू शकले नाहीत तर आयसीसी मोठं पाऊल उचलू शकते. आयीसीसीने बीसीसीआयकला एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या आयोजनासाठी भारत सरकारकडून करात सूट मिळण्याबाबत चर्चा करण्यास सांगितलं आहे. आयसीसीचा नियम आहे की, यजमान देशाने स्पर्धेच्या आय़ोजनासाठी सरकारकडून करात सूट मिळवून द्यावी. या प्रकरणी काहीच हालचाली झालेल्या नसल्याचे समजते. हेही वाचा :  फायनलआधी मेस्सीच्या दुखापतीने वाढवली अर्जेंटिनाचा चिंता, सरावाला न आल्याने चर्चा

 भारत सरकारने भारतात आय़सीसी टी20 वर्ल्ड कप 2016 च्या आयोजनावेळी आयसीसीला करात कोणतीच सूट दिली नव्हती. आता आगामी वर्ल्ड कपसाठी भारताकडून असे कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. बीसीसीआयने आयसीसीला याबाबतीत काही होऊ शकणार नाही अशी माहिती दिली असल्याचे समजते. त्यामुळे आयसीसीला वाटले तर ते स्पर्धा भारतातून बाहेर खेळवू शकतात असंही बीसीसीआयकडून सांगण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

2016 च्या टी20 वर्ल्ड कपवेळी भारत सरकारने बीसीसीआयला करात सूट न मिळाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले होते. आय़सीसीने 190 कोटी रुपये टॅक्स सरचार्ज म्हणून बीसीसीआयच्या महसूलातून वसूल केले होते. बीसीसीआयने याबाबत आयसीसी ट्रिब्यूनल कोर्टात अपील केलं आहे. हेही वाचा :  लाइव्ह सामन्यात DRS डाऊन, पंचांची पंचाईत तर बांगलादेशचे खेळाडू भडकले

 वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी करात सूट देण्यास भारत सरकार पुन्हा नकार देऊ शकते. त्यामुळे आयसीसी आणि बीसीसीआय पुन्हा अडचणीत येऊ शखतात. आयसीसीने आधीच प्रसारण महसूलाच्या 21.84 टक्के (जवळपास 900 कोटी) टॅक्स बील तयार केलं आहे. आयसीसी वर्ल्ड कप आधी हा प्रश्न न सुटल्यास आणि BCCI च्या महसूलातून वसूल केल्यास दोघांमध्ये कायदेशीर लढाऊ निश्चित आहे. देशातील सर्वात मोठी उलाढाल होत असलेल्या खेळाला करात सुट देऊन सरकार लोकांना काय सांगेल? तसंच जर आय़सीसीने कराच्या पैशांबाबत नमतं घेतलं तर इतर सदस्य देश याविरोधाता आवाज उठवतील असं या प्रकरणाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात