JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup: बुमरा टी20 वर्ल्ड कप खेळणार? पाहा बुमराबाबत हे काय म्हणाला गांगुली...

T20 World Cup: बुमरा टी20 वर्ल्ड कप खेळणार? पाहा बुमराबाबत हे काय म्हणाला गांगुली...

T20 World Cup: बुमराच्या वर्ल्ड कप समावेशाबाबत बीसीसीसीआयनं अधिकृतरित्या कोणतीही माहिती जारी केलेली नाही. त्यातच आज बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं एक मोठं विधान केलं आहे.

जाहिरात

जसप्रीत बुमरा, सौरव गांगुली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 सप्टेंबर: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याचं जवळपास निश्चित आहे. कारण सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी बुमराला पुन्हा दुखापत झाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन्ही टी20 सामन्यात तो खेळणार नाही. बुमराच्या वर्ल्ड कप समावेशाबाबत बीसीसीसीआयनं अधिकृतरित्या कोणतीही माहिती जारी केलेली नाही. त्यातच आज बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं एक मोठं विधान केलं आहे. अजूनही काही वेळ शिल्लक… गांगुलीनं आज एका मीडिया प्लॅटफॉर्मशी बोलताना म्हटलंय की ‘जसप्रीत बुमरा अजूनही दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेला नाही. वर्ल्ड कपला अजूनही काही वेळ शिल्लक आहे.’ गांगुलीच्या या विधानानंतर सध्या सोशल मीडियात उलटसुलट चर्चा रंगलेली आहे. कारण बुमराच्या दुखापतीचं स्वरुप पाहता तो इतक्या लवकर रिकव्हर होईल का हाही प्रश्नच आहे. त्यात केवळ वर्ल्ड कपसाठी अट्टहासानं त्याला ऑस्ट्रेलियाला नेलं आणि स्पर्धेदरम्यान पुन्हा दुखापतीनं उचल खाल्ली तर काय? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत.

संबंधित बातम्या

बुमरा सध्या एनसीएत तिरुअनंतपूरम टी20 नंतर बुमरा थेट बंगळुरुतल्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीत दाखल झाला. तिथे बीसीसीआयची मेडिकल टीम सध्या त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे. बीसीसीआयनं अद्यापही त्याच्या दुखापतीबाबत आणि वर्ल्ड कपमधल्या समावेशाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे गांगुलीच्या आजच्या विधानानंतर तो पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्याआधी फिट होणार का? पुढच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या भारतीय संघात त्याचा समावेश असेल? असे अनेक प्रश्न आता उभे राहिले आहेत. हेही वाचा -  T20 World Cup: आमचा पहिला नंबर… वर्ल्ड कपसाठी 16 दिवस आधीच ही टीम पोहोचली ऑस्ट्रेलियात तिरुअनंतपूरम टी20 आधी पुन्हा दुखापत जसप्रीत बुमराला पाठीच्या दुखापतीमुळे आशिया कपध्ये खेळता आलं नाही. टीम इंडियाला याचा सर्वात मोठा फटका बसला. कारण आशिया कपमधून भारतीय संघाला सुपर फोर फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत नागपूरमधल्या सामन्यात बुमरानं कमबॅक केलं. त्यानंतर हैदराबादच्या शेवटच्या टी20तही तो खेळला. पण या दोन सामन्यानंतर पुन्हा एकदा बुमराच्या दुखापतीनं उचल खाल्ली. मंगळवारी सराव सत्रादरम्यान बॉलिंग करताना बुमराला दुखापत झाली होती. म्हणूनच रोहित शर्मानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20त बुमराला न खेळवण्याचा निर्णय घेतला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या