JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Cricket: क्रिकेटच्या मैदानातून थेट टेनिस कोर्टवर पोहोचले दोन दिग्गज, Viral फोटोमागचं कारण काय?

Cricket: क्रिकेटच्या मैदानातून थेट टेनिस कोर्टवर पोहोचले दोन दिग्गज, Viral फोटोमागचं कारण काय?

Cricket: सचिन आणि धोनीचा एक फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पण हा फोटो क्रिकेटच्या मैदानातला नाही. त्यामुळे हे दोघं क्रिकेट सोडून हे दुसरं काय करतायत असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

जाहिरात

सचिन आणि धोनी टेनिस कोर्टवर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 ऑक्टोबर:   मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. पण या महान खेळाडूंची जादू अजूनही कायम आहे. सचिन आणि धोनीनं क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यामुळे जेव्हा हे दोघे एकत्र दिसत असतील तर चर्चा ही होणारच. आताही नेमकं तेच झालंय. सचिन आणि धोनीचा एक फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पण हा फोटो क्रिकेटच्या मैदानातला नाही. त्यामुळे हे दोघं क्रिकेट सोडून हे दुसरं काय करतायत असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. टेनिस कोर्टवर सचिन-धोनी टेनिस कोर्टवर हातात रॅकेट धरलेले धोनी आणि सचिन पाहून वाटतंय यांच्यात टेनिसचा एखादा सामना रंगलाय. आणि नेमकं कारणही तेच आहे. मिळालेल्या माहितीनुसार टेनिस कोर्टवर सचिन आणि धोनीनं टेनिसचा आनंद लुटला. पण हे एका जाहिरातीचं शूटिंग असल्याची माहिती समोर आली आहे. आयपीएलमध्ये धोनी खेळत असलेल्या चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीनंही या दोघांचा फोटो ट्विट केला आहे. त्यात 7-10 असं लिहून दोघेही बॉटन हँड ड्राईव्हजसाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे. 7-10 याचा अर्थ दोघांचा स्कोर नसून त्या दोघांच्या नावाऐवजी धोनी आणि सचिनच्या जर्सी नंबरचा उल्लेख करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा -  Team India T20 World Cup: टीम इंडियाचे ‘जंटलमन’ मिशन वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना, पाहा PHOTO सचिन धोनीचं टेनिसप्रेम जगजाहीर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीचं टेनिसप्रेम सर्वांनाच माहित आहे. अनेकदा विम्बल्डन, यूएस ओपनसारख्या ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये सामने पाहताना टीम इंडियाचे हे महान खेळाडू अनेक वेळा दिसले आहेत. यंदाच्या विम्बल्डन नंतर महेंद्रसिंग धोनी यूएस ओपनचे सामने पाहण्यासाठी थेट न्यूयॉर्कला देखील पोहोचला होता. इतकच नाही तर टेनिस व्यतिरिक्त धोना काही दिवसांपूर्वी गोल्फ कोर्सवर देखील दिसला होता. भारताचे महान कर्णधार कपिल देव यांच्यासह गोल्फ खेळतानाचा धोनीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या