भारतीय संघ मिशन टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. त्याआधी मुंबईत खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचं फोटो सेशनही झालं. यावेळी भारतीय खेळाडूंनी निळा सूट परिधान केला होता.
टीम इंडियाचा अनुभवी लेग स्पिनर युजवेंद्र चहलनं आपली पत्नी धनश्री वर्मासोबतचा फोटो शेअर केला आहे. धनश्रीनं चहलसह टीम इंडियाला वर्ल्ड कप मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सूर्यकुमार यादवनंही सोशल मीडियात एक फोटो शेअर केला आहे. त्यात सूर्यासह सूटाबुटात रिषभ पंत, दिनेश कार्तिक आणि कॅप्टन रोहित शर्मा दिसत आहेत.
आणखी एक फोटो सोशल मीडियात दिसतोय तो म्हणजे कुंग फू पंड्या अर्थात हार्दिक पंड्याचा. या फोटोत पंड्या आणि त्याच्या जोडीला दिनेश कार्तिकही आहे.
विराट कोहलीनं फ्लाईटमध्ये बसण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात विराटसह युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेल दिसत आहे.