भारत-बांगलादेश मॅचवर पावसाचं संकट
अॅडलेड, 31 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पुढचा सामना बांगलादेशशी होणार आहे. बुधवारी अॅडलेडमध्ये हा सामना खेळवला जाईल. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे याही मॅचवर पावसाचं सावट आहे. पण ही बाब टीम इंडियासाठी चिंतेची ठरु शकते. कारण सेमी फायनलच्या दृष्टीनं बांगलादेशविरुद्ध कशाही परिस्थितीत भारतीय संघाला विजय मिळवणं गरजेचं आहे. भारतानं याआधी पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध विजय मिळवला असून पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र पराभव स्वीकारावा लागला होता. अॅडलेडमध्ये काय परिस्थिती? अॅडलेडमध्ये मंगळवारी मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मॅचदिवशी म्हणजे बुधवारीही कमी अधिक प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत सामना पूर्ण झाला नाही तर दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल. पण त्याने पॉईंट टेबलमध्ये काही बदल होईल का? हेही वाचा - Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवाला पाहून पुजाऱ्याची खुलली कळी; नृसिंहवाडीतील सेल्फीचा लय भारी Video भारत-बांगलादेश मॅच झाली नाही तर… सुपर 12 फेरीतल्या ग्रुप 2 मध्ये दक्षिण आफ्रिका सध्या 5 पॉईंट्ससह टॉपवर आहे. तर टीम इंडिया 3 मॅचमध्ये 2 जिंकून 4 पॉईंटसह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय बांगलादेशही 4 पॉईंटसह तिसऱ्या तर झिम्बाब्वे 3 पॉईंटसह चौथ्या स्थानावर आहे. भारत-बांगलादेश सामना झाला नाही आणि जर टीम इंडियानं पुढच्या सामन्यात झिम्बाब्वेला हरवलं तर भारतीय संघाच्या खात्यात 7 पॉईंट्स जमा होतील. दुसरीकडे पाकिस्तान आपले उरलेले दोन्ही सामने जिंकली तरी त्यांचे पॉईंट्स 6 होणार आहेत. त्यामुळे जर टीम इंडिया हरली किंवा पुढचे दोन्ही सामने पावसामुळे वाया गेले तरच पाकिस्तानला आशा आहे. हेही वाचा - Ind vs SA: बॉलर म्हणतोय नाही… पण कार्तिकचा हट्ट… रोहितनं घेतला रिव्ह्यू, पाहा मग काय घडलं? टीम इंडिया अॅडलेडमध्ये दाखल दरम्यान आपल्या पुढच्या आव्हानासाठी रोहित शर्मा अँड कंपनी अॅडलेडमध्ये दाखल झाली आहे. बीसीसीआयनं टीम अॅडलेडमध्ये पोहोचल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
टीम इंडियाचे उर्वरित सामने 02 नोव्हेंबर 2022 भारत वि. बांगलादेश, सुपर 12 अॅडलेड ओव्हल, दुपारी 1.30 वा., 06 नोव्हेंबर 2022 भारत वि. झिम्बाब्वे, सुपर 12 मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, दुपारी 1.30 वा.