कोल्हापूर, 31 ऑक्टोबर: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चा कोल्हापूर दौरा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. काल अचानकपणे सचिन तेंडुलकर कोल्हापुरात आला होता. त्यावेळी त्यानं कोल्हापुरातील उद्योजक तेज घाटगे यांच्या फार्महाऊसवर मुक्काम ठोकला. त्यानंतर आज पहाटे सचिन नृसिंहवाडीत पोहोचला. तिथे त्यानं दत्तदर्शन घेतलं आणि काकड आरतीला हजेरी लावली. पण यावेळी सचिन येणार याचा कुणालाही अंदाज नसल्यानं मंदिरातील पुजाऱ्यांसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी सचिनसह त्याचा लेक अर्जुन तेंडुलकरही होता. सचिनचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
मंदिरात क्रिकेटच्या देवाला पाहून पुजाऱ्याला धक्काच बसला. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आज नृसिंहवाडी येथे दत्त दर्शन घेतले. #SachinTendulkar #ViralVideo #cricket pic.twitter.com/rl613C7hNp
— News18Lokmat (@News18lokmat) October 31, 2022
सचिनचा कोल्हापूर दौरा दरम्यान सचिन उद्योजक तेज गाटगे यांच्या फार्महाऊसवर येणार याची कल्पना खुद्द घाटगे यांनाही नव्हती. त्यांचे बंधू गौरव घाटगे यांनी काल त्यांना खास पाहुणे येणार असून त्वरित फार्म हाऊसवर पोहोचा असं सांगितलं. पण हे पाहुणे म्हणजे खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे हे कळल्यावर तेज घाटगे यांना मात्र आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी फेसबुक पोस्ट करत सचिनच्या या सरप्राईज भेटीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सचिनसोबतचे फोटोही शेअर केले आहेत.
हेही वाचा - T20 World Cup: टीम इंडियाचा हा मॅचविनर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून आऊट? मोठी अपडेट समोर कोल्हापूरहून गोव्याला रवाना सचिनचा लेक सध्या गोव्याकडून खेळत आहे. त्यामुळे कोल्हापुरातून सचिन मुलगा अर्जुनसह गोव्याकडे रवाना झाला. यावेळी बेळगावात सचिननं एका चहाच्या टपरीवर चहाही घेतला. यावेळी त्या चहाच्या टपरीचे मालक पिंटू प्रकाश याना यांचा सुखद धक्का बसला. सचिननं त्यांना टिपही दिली आणि जाताना सेल्फीही घेतला.