हार्दिक आणि विल्यमसन
वेलिंग्टन, 17 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधला पराभव विसरुन टीम इंडिया पुढच्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. वर्ल्ड कपनंतर भारताचा पहिला सामना होईल तो न्यूझीलंडशी. भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतला पहिला सामना 18 नोव्हेंबरला होणार आहे. याच मॅचआधी काल एक मजेशीर घटना घडली. निमित्त होतं टी20 ट्रॉफीसोबत कॅप्टन्सच्या फोटोशूटचं. फोटोशूटवेळी आला वारा आणि… वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन आणि भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या या ट्रॉफी शूटवेळी उपस्थित होता. यावेळी एका पोडियमवर टी20 मालिकेची ट्रॉफी ठेवण्यात आली होती. या ट्रॉफीसोबत फोटोशूट सुरु असतानाच वारा आला आणि पोडियमवरुन ट्रॉफी कलंडली. त्यावेळी ही ट्रॉफी हार्दिकच्या दिशेनं जात असतानाच विल्यमसननं मात्र वेगानं ती पकडली. या मजेशीर प्रकारानंतर हार्दिकनं हसत हसतच विल्यमसनला रिप्लाय दिला. सोशल मीडियात हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
अशी असेल भारत-न्यूझीलंड टी20 मालिका 18 नोव्हेंबर, पहिली टी20 - वेलिंग्टन 20 नोव्हेंबर, दुसरी टी20 - माऊंट माँगानुई 22 नोव्हेंबर, तिसरी टी20 - नेपियर हेही वाचा - काय? टीव्हीवर दिसणार नाही भारतविरुद्ध न्यूझीलंड सीरिज; मग मॅच बघायची तरी कुठे? हे आहे ऑप्शन भारताचा टी20 संघ - हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), ईशान किशन, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.