मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /काय? टीव्हीवर दिसणार नाही भारतविरुद्ध न्यूझीलंड सीरिज; मग मॅच बघायची तरी कुठे? हे आहे ऑप्शन

काय? टीव्हीवर दिसणार नाही भारतविरुद्ध न्यूझीलंड सीरिज; मग मॅच बघायची तरी कुठे? हे आहे ऑप्शन

Ind Vs NZ

Ind Vs NZ

या दोन्ही सीरिजमधील मॅच टीव्हीवर दिसणार नाहीत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 17 नोव्हेंबर:  ऑस्ट्रेलिया येथे नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियावर चाहते नाराज झाले. टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन रोहित शर्माला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. मात्र, या सर्व गोष्टी मागे सोडून टीम इंडिया पुन्हा नव्यानं सुरुवात करण्यास सज्ज झाली आहे. टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर गेली आहे. 18 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड दरम्यान टी-20 सीरिज सुरू होत आहे. भारताची टीम हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. तर, यजमान न्यूझीलंडचं नेतृत्त्व केन विल्यमसनकडे असेल. टी-20 सीरिजनंतर तीन मॅचची वन-डे सीरिजही खेळवली जाणार आहे. मात्र, या दोन्ही सीरिजमधील मॅच टीव्हीवर दिसणार नाहीत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळली जाणारी ही टी-20 आणि वन-डे सीरिज टीव्हीवर दाखवली जाणार नाही. या सीरिजचं अॅमेझॉन प्राइमवर स्ट्रिमिंग होणार आहे. अॅमेझॉन प्राईम अॅप आणि वेबसाइटवर क्रिकेट मॅच बघता येतील. सोनी टीव्ही किंवा स्टार स्पोर्ट्सकडे न्यूझीलंडमधील मॅचेसचं प्रसारण करण्याचे अधिकार नाहीत. असं असलं तरी, डीडी स्पोर्ट्सवर या मॅचेस प्रसारित केल्या जाऊ शकतात. कारण अनेकदा डीडीवर टीम इंडियाच्या मॅचेस दाखवल्या जातात.

  भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीम टी-20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचले होते. मात्र, सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा पाकिस्ताननं तर भारताचा इंग्लंडनं पराभव केला होता. त्यानंतर, दोन्ही टीम पहिल्यांदाच मैदानावर उतरत आहेत. भारतानं टीममधील काही वरिष्ठ खेळाडूंना आराम देऊन सर्व तरुण खेळाडूंची टीम न्यूझीलंडला पाठवली आहे. नियमित कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन हे सिनिअर खेळाडू न्यूझीलंड सीरिजचा भाग नाहीत. याशिवाय, हेड कोच राहुल द्रविडदेखील न्यूझीलंडला गेलेले नाहीत. त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण कोचिंगची जबाबदारी पार पाडणार आहेत.

  भारतीय प्रमाणवेळेनुसार भारत-न्यूझीलंड सीरिजचं वेळापत्रक

  - पहिली टी-20 मॅच: 18 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (वेलिंग्टन)

  - दुसरी टी-20 मॅच: 20 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (माउंट मॉनगनुई)

  - तिसरी टी-20 मॅच: 22 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 बजे (नेपियर)

  - पहिली वन-डे: 25 नोव्हेंबर 2022, सकाळी 7 वाजता (ऑकलंड)

  - दुसरी वन-डे: 27 नोव्हेंबर 2022, सकाळी 7 वाजता (हॅमिल्टन)

  - तिसरी वन-डे: 30 नोव्हेंबर 2022, सकाळी 7 वाजता (क्राइस्टचर्च)

  टी-20 सीरिजसाठी भारतीय टीम: हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (व्हाईस कॅप्टन), ईशान किशन, शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीपसिंग, उमरान मलिक.

  वन-डे सीरिजसाठी भारतीय टीम: शिखर धवन (कॅप्टन), ऋषभ पंत (व्हाईस कॅप्टन), शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीपसिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

  टी-20 सीरिजसाठी न्यूझीलंडची टीम: केन विल्यमसन (कॅप्टन), फिन एलन, मायकल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, डेरेल मिचेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, टीम साउदी, ब्लेअर टिकनर.

  वन-डे सीरिजसाठी न्यूझीलंडची टीम: केन विल्यमसन (कॅप्टन), फिन एलन, मायकल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेन्री, टॉम लेथम, डेरेल मिचेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टीम साउदी.

  First published:

  Tags: India, Sports, T-20 cricket