मुंबई, 22 जानेवारी : सध्या क्रिकेट विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. भारताचा क्रिकेटर के एल राहुल अथिया शेट्टी सोबत 23 जानेवारी रोजी लग्न करणार आहे. यासोबतच आता पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शान मसूद हा देखील विवाह बंधनात अडकला असून त्याच्या विवाहाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानचा स्टार खेळाडू शान मसूदने निशा खानशी लग्न केले आहे. 20 जानेवारी रोजी पेशावरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहोळा पारपडला. मागील आठवड्यापासून त्यांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम पेशावर येथे सुरु होते. हे ही वाचा : किंग कोहली, हिटमॅन रोहितनंतर आता शुभमनलाही मिळालं नवं नाव क्रिकेट विश्वातही त्यांच्या लग्नाची फार चर्चा होती. शान मसूदच्या लग्नाला पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि शादाब खान इत्यादी क्रिकेटर उपस्थित होते. 27 जानेवारी रोजी शान मसूदच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे.
शान मसूदने लग्नाआधीचे आणि नंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून शानची पत्नी निशाचा लग्नातील लूक फार चर्चेचा विषय ठरत आहे.
शान मसूद हा पाकिस्तान संघाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला असून त्याने 28 कसोटी सामन्यांमध्ये 1500 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये 111 धावा आणि 19 टी-20 सामन्यात 395 धावा केल्या आहेत.