जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / किंग कोहली, हिटमॅन रोहितनंतर आता शुभमनलाही मिळालं नवं नाव

किंग कोहली, हिटमॅन रोहितनंतर आता शुभमनलाही मिळालं नवं नाव

किंग कोहली, हिटमॅन रोहितनंतर आता शुभमनलाही मिळालं नवं नाव

शुभमन गिल रोहित शर्मा आणि ईशान किशन यांचा रेकॉर्ड मोडत जगातील सर्वात कमी वयाचा द्विशतक करणारा फलंदाज ठरला. तेव्हा किंग कोहली, हिटमॅन रोहितनंतर आता शुभमन गिलला देखील नवं नाव मिळालं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 जानेवारी :  भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होत असलेल्या वनडे मालिकेत भारतीय संघ सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी करीत आहे. 21 जानेवारी रोजी झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यातही भारताने न्यूझीलंडवर 8 विकेट्सने विजय मिळवला. यासोबत भारताने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात भारताचा युवा क्रिकेटर शुभमन गिल याने दमदार कामगिरी करून द्विशतक ठोकले. भारताचे दिग्गज खेळाडू स्वस्तात माघारी परतत असताना त्यानेगिलने एकाएकी खिंड लढवून न्यूझीलंड समोर 360 धावांचे आव्हान ठेवले. गिलच्या या खेळीनंतर सर्वस्थरावून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. तसेच त्याने रोहित शर्मा आणि ईशान किशन यांचा रेकॉर्ड मोडत जगातील सर्वात कमी वयाचा द्विशतक करणारा फलंदाज ठरला. तेव्हा किंग कोहली, हिटमॅन रोहितनंतर आता शुभमन गिलला देखील नवं नाव मिळालं आहे. हे ही वाचा : चायनीज, पनीर अन् बरंच काही… टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये खायला काय असतं? चहलने दाखवला Video 21 जानेवारी रोजी देखील भारताने चांगली खेळी करून आयसीसी रँकिंग मध्ये अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंडला नमवले. त्यानंतर भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी शुभमन गिलची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी शुभमनला नवीन टोपण नाव दिले. गावस्कर म्हणाले, “मी तुला ‘स्मूथमन गिल’ हे नवीन टोपणनाव दिले आहे. मला आशा आहे की तुमची हरकत नसेल”. हे ही वाचा : RCB संघाच्या ट्विटर अकाऊंटवर हॅकर्सचा कब्जा यावर शुभमन गिलने उत्तर दिले, ‘सर मला काहीच हरकत नाही.’ न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत गिलने 40 धावांची नाबाद खेळी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात