JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / FIFA WC 2022: दारु... छोटे कपडे... सेक्स... फिफा वर्ल्ड कपसाठी कतारमध्ये 'हे' कडक नियम लागू!

FIFA WC 2022: दारु... छोटे कपडे... सेक्स... फिफा वर्ल्ड कपसाठी कतारमध्ये 'हे' कडक नियम लागू!

FIFA WC 2022: यंदाच्या फुटबॉल वर्ल्ड कपसाठी कतार प्रशासनानं काही कडक नियम लागू केले आहेत. या नियमांचं पालन न केल्यास चाहत्यांना जेलमध्येही जाण्याची वेळ येऊ शकते.

जाहिरात

कतारमध्ये कडक नियम लागू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दोहा, 18 नोव्हेंबर: 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये फुटबॉल वर्ल्ड कप सुरु होणार आहे. जगभरातील 32 टीम्स या वर्ल्ड कपसाठी कतारमध्ये दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर युरोप, दक्षिण आणि उत्तर अमेरिकेसह आशिया आणि आफ्रिकेतील फुटबॉल चाहते कतारमध्ये आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी पोहोचले आहेत. कतार आणि इक्वेडोर संघातल्या सामन्यानं फिफा वर्ल्ड कपचं रणशिंग फुंकलं जाईल. पण याचदरम्यान यंदाच्या फुटबॉल वर्ल्ड कपसाठी कतार प्रशासनानं काही कडक नियम लागू केले आहेत. या नियमांचं पालन न केल्यास चाहत्यांना जेलमध्येही जाण्याची वेळ येऊ शकते. हया कार्ड बंधनकारक कतारमध्ये वर्ल्ड कप पाहण्यासाठी येणाऱ्यांकडे हया कार्ड असणं गरजेचं आहे. आता हे हया कार्ड म्हणजे काय? तर हया कार्ड हे एखाद्या आयडेन्टिटी कार्ड सारखच असतं. त्याद्वारे तुम्ही कतारमध्ये कुठेही फिरु शकता. पण त्यासाठी तुम्हाला आधी या कार्डसाठी अर्ज करावा लागेल. 3-4 दिवसात तुम्हाला हे कार्ड मिळून जातं. कार्ड दाखवून मेट्रो आणि बसमधून मोफत प्रवास करता येतो. इतकच नाही तर हया कार्ड असल्यास कतारमध्ये व्हिसाची गरज लागत नाही.

संबंधित बातम्या

दारु पिण्यासंदर्भात असे आहेत नियम कतारमध्ये बाहेरुन दारु आणण्यावर निर्बंध आहेत. तिथल्या स्थानिक आणि लायसन्सधारक हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्येच दारु पिण्याची परवानगी आहे. बाहेरुन येणाऱ्या चाहत्यांसाठी फॅन झोन बनवण्यात आले आहेत. त्याठिकाणी दारु मिळू शकते. पण फॅन झोनच्या बाहेर दारु पिताना आढळल्यास हजारो रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. दारुसह ई सिगरेटवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. हेही वाचा -  FIFA World Cup 2022: टी20 चॅम्पियनपेक्षा फिफा वर्ल्ड कपमधली 32वी टीम होणार मालामाल, फिफासमोर ICC म्हणजे… सेक्ससंदर्भात नियमावली कतारमध्ये लग्नाआधी रिलेशनशीपमध्ये राहणं हा गुन्हा आहे. त्यामुळे लग्न न झालेल्या कपल्सना कतारमध्ये हॉटेल रुम भाड्याने मिळणार नाही. समलैंगिक संबंधही इथे अपराध मानला जातो. आणि त्यासंदर्भातील नियम तोडल्यास जेलची हवा खाण्याची वेळ येऊ शकते. त्याचबरोबर हॉटेलमध्ये कोणत्याही प्रकारचे सेक्स टॉईज आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.

ड्रेस कोडही बंधनकारक कतार सरकारने आपल्या वेबसाईटवर येणाऱ्या फुटबॉल प्रेमींना आणि पर्यटकांना तिथली संस्कृतीचा आदर करा असं म्हटलंय. बाहेरील देशातून येणाऱ्या महिलांनी स्लीव्हलेस किंवा मिनी स्कर्ट परिधान करण्यावर बंदी आहे. खांद्यापासून गुडघ्यापर्यंत शरीर झाकलं जाईल असे कपडे घालण्यासाठी सांगण्यात आलंय. पब्लिक प्लेसमध्ये हे नियम पाळण्याची ताकीद देण्यात आली आहे. तर पुरुषांनीही जीन्स किंना शॉर्ट गुडघे झाकले जातील अशीच घालावी असं नियमात म्हटलं आहे. एकूणच कतारमधला फिफा वर्ल्ड कप बाहेरुन येणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या