JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टोकाचे विरोधक येणार एकत्र! MCA निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची डिनर डिप्लोमसी

टोकाचे विरोधक येणार एकत्र! MCA निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची डिनर डिप्लोमसी

मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी बुधवारी संध्याकाळी 7 वाजता सर्वपक्षीय नेत्यांची डिनर डिप्लोमसीचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात

MCA निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची डिनर डिप्लोमसी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 ऑक्टोबर : शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यात शिंदे गट-भाजप आणि महाविकास आघाडी असे दोन मोठे गट पडले आहेत. ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वाद तर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याच वादातून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकी आधी शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्या आलं. त्यानंतर भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र, तरीही काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने ही निवडणूक होईल. एकीकडे हा टोकाचा संघर्ष सुरू असताना मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी मात्र राज्यातील सर्वपक्षीय एकत्र आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षिय नेत्यांची उद्या डिनर डिप्लोमसी ठेवण्यात आली आहे. MCA निवडणुकीसाठी सर्व पक्षीय नेत्यांची डिनर डिप्लोमसी मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी उद्या बुधवारी संध्याकाळी 7 वाजता वानखेडे स्टेडियम मधील मुंबई क्रिकेट संघटनेच्या सभागृहात सर्व पक्षीय नेत्यांचे नेत्यांचे स्नेह भोजन होणार आहे. या स्नेह भोजणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी क्राँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थितीत असणार आहेत. निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी यापूर्वी झालेल्या बैठकीला भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाड, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि अमोल काळे उपस्थित आहेत. त्यांच्यासोबतच एमसीएचे 200 पेक्षा जास्त मतदार सदस्य उपस्थित आहेत. येत्या 20 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार आहे. या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावरुन चर्चा होणार हे अद्याप कळालेलं नाही. वाचा - MCA Election: अंधेरीची लढत टळली, पण पवारांची पुढच्या निवडणुकीसाठी फिल्डिंग, मुंबईत बोलावली तातडीची बैठक अमोल काळे-संदीप पाटील लढत दरम्यान एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही माजी क्रिकेटर संदीप पाटील आणि पवार-शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे यांच्यात रंगणार आहे. आशिष शेलार बीसीसीआय निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं पवार-शेलारांच्या गटानं अमोल काळेंच्या नावाची अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली. त्याआधी संदीप पाटील यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळीही मोठा ड्रामा रंगला होता. संदीप पाटलांनी अर्ज दाखल करताना आपण पवार गटाकडून  अर्ज दाखल करत असल्याचं म्हटलं होतं. पण त्यानंतर पवार आणि शेलारांची युती झाली. त्यावेळी शेलारांनी अध्यक्षपदासाठी अर्ज केला. त्यानंतर संदीप पाटलांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता अध्यक्षपदी पाटलांची वर्णी लागणार की पवार-शेलार गटाचा उमेदवार सिक्सर मारणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

नाना पटोले यांच्या वक्तव्यमुळे चर्चा मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकाच दिवशी केलेल्या आवाहनाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला आहे. या सगळ्याला राजकीय वास येत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही पैशाची, खजिन्याची निवडणूक आहे. एमसीएच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरु असलेले राजकारण सध्या राज्यातील आणि देशातील लोक पाहत आहेत. आतापर्यंत अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी, कोणता विरोध होता, ते माहिती नाही. पण राज ठाकरे आणि शरद पवार यांनी एकदम अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. त्यामुळे या सगळ्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील राजकारण कारणीभूत आहे का, असा वास येत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या