मुंबई, 17 ऑक्टोबर: मुंबई क्रिकेट असोसिशनची त्रैवार्षिक निवडणूक तोंडावर आली आहे. याचदरम्यानं सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीसाठी शरद पवार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार एकत्र आले आहेत. त्यातच नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष आणि एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकी संदर्भात तात्काळ बैठक बोलवल्याची माहिती आहे. एमसीएच्या सभागृहात ही बैठक होणार आहे. बैठकीला कुणाची उपस्थिती या बैठकीला आशिष शेलारांसह राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाड, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि अमोल काळे उपस्थित आहेत. त्यांच्यासोबतच एमसीएचे 200 पेक्षा जास्त मतदार सदस्य उपस्थित आहेत. येत्या 20 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अवघे काही तास आधी पवारांनी ही बैठक बोलवल्यानं चर्चांना रंगली आहे. या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावरुन चर्चा होणार हे अद्याप कळालेलं नाही. अमोल काळे-संदीप पाटील लढत दरम्यान एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही माजी क्रिकेटर संदीप पाटील आणि पवार-शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे यांच्यात रंगणार आहे. आशिष शेलार बीसीसीआय निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं पवार-शेलारांच्या गटानं अमोल काळेंच्या नावाची अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली. त्याआधी संदीप पाटील यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळीही मोठा ड्रामा रंगला होता. संदीप पाटलांनी अर्ज दाखल करताना आपण पवार गटाकडून अर्ज दाखल करत असल्याचं म्हटलं होतं. पण त्यानंतर पवार आणि शेलारांची युती झाली. त्यावेळी शेलारांनी अध्यक्षपदासाठी अर्ज केला. त्यानंतर संदीप पाटलांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता अध्यक्षपदी पाटलांची वर्णी लागणार की पवार-शेलार गटाचा उमेदवार सिक्सर मारणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. हेही वाचा - T20 World Cup: टीम इंडिया 17 दिवस आधी ऑस्ट्रेलियात का पोहोचली? हार्दिक पंड्यानं केला खुलासा शेलार बीसीसीआयच्या खजिनदारपदी? दरम्यान आशिष शेलारांनी बीसीसीआयच्या खजिनदारपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. उद्या (18 ऑक्टोबरला) बीसीसीआयची ही निवडणूक होणार आहे. त्यावेळी आशिष शेलारांकडे खजिनदारपद येण्याची दाट शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







