शमीनं उतरवला पाकिस्तानचा तोरा
मेलबर्न, 13 नोव्हेंबर: इंग्लंडनं मेलबर्नमध्ये टी20 वर्ल्ड कप जिंकून मोठा इतिहास घडवला. जोस बटलरच्या इंग्लंडनं दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपची ट्रॉफी पटकावली. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानला इंग्लंडसमोर फारशी चमक दाखवता आली नाही. पण आता पाकिस्तानच्या या पराभवानंतर शमीनं केलेलं ट्विट चांगलच चर्चेत आहे. ट्विटमध्ये काय म्हणाला शमी? मोहम्मद शमीनं आपल्या ट्विटमध्ये विजेत्या इंग्लंड संघाचं अभिनंदन केलं आहे. पण त्याच ट्विटवर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं ब्रोकन हार्टचा इमोजी रिप्लाय केला. त्यावर शमीनं रिप्लाय देत चांगलीच खिल्ली उडवली. शमीनं या ट्विटमध्ये शोएबला रिप्लाय देताना म्हटलंय… ‘सॉरी भावा… पण यालाच म्हणतात कर्मा…’
पाकिस्तानी पंतप्रधानांचं ते ट्विट आणि… दरम्यान याआधी पाकिस्तानी पंतप्रधानांनी टीम इंडियाच्या पराभवानंतर एक ट्विट करत भारताला डिवचलं होतं. भारत हरल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इंग्लंडनं भारताच्या 10 विकेट्सनी केलेल्या पराभवावर खोचक टिप्पणी केली होती. त्याचाच बदला घेत शमीनं शोएब अख्तरची खिल्ली उडवली आणि एका अर्थानं पाकिस्तानचा तोराही उतरवला. हेही वाचा - Eng vs Pak Final: 2016 मध्ये हरवलं… पण नंतर इंग्लंडला जिंकून दिले 2 वर्ल्ड कप; पाहा एका चॅम्पियनची कहाणी मेलबर्नमध्ये पाकिस्तानचा धुव्वा इंग्लंडनं फायनलमध्ये पाकिस्तानवर पूर्णपणे वर्चस्व गाजवल. ब्रिटीश संघाच्या आक्रमणासमोर पाकिस्तानला अवघ्या 137 धावाच करता आल्या. त्यानंतर स्टोक्सची खेळी पाकिस्तानी गोलंदाजांवर भारी ठरली. या विजयासह इंग्लंडनंही 30 वर्षांपूर्वीचा एक हिशोब चुकता केला. इंग्लंडनं याच मेलबर्नमध्ये 1992 साली वन डे वर्ल्ड कप पाकिस्तानविरुद्ध गमावला होता. त्या पराभवाचा जोस बटलरच्या टीमनं वचपा काढला.