मेलबर्न, 13 नोव्हेंबर: इंग्लंडनं पाकिस्तानला हरवून 2010 नंतर दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. गेल्या तीन वर्षातलं आयसीसी स्पर्धेतलं हे इंग्लंडचं दुसरं मोठं विजेतेपद ठरलं. पण या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा हीरो एकच होता. तो म्हणजे बेन स्टोक्स. स्टोक्सनं मेलबर्नमधल्या फायनलमध्ये नाबाद अर्धशतकी खेळी करुन इंग्लंडला विश्वविजेता बनवलं. तो 2019 सालीही इंग्लंडच्या विजयाचा हीरो होता. पण याच बेन स्टोक्सला 2016 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये एका वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. 2016 साली स्टोक्समुळे इंग्लंडनं गमावला वर्ल्ड कप 2016 साली इंग्लंडचा संघ टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. या सामन्यात इंग्लंडनं दमदार कामगिरी करताना वेस्ट इंडिजवर शेवटपर्यंत वर्चस्व गाजवलं होतं. पण शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच पूर्ण फिरली. ही ओव्हर कॅप्टन ऑईन मॉर्गननं बेन स्टोक्सकडे दिली आणि त्यावेळी वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी हव्या होत्या 20 धावा. पण बेन स्टोक्सच्या पहिल्या चार बॉलवर विंडीजच्या कार्लोस ब्रेथवेटनं 4 सिक्सर्स ठोकून इंग्लंडला विजयापासून दूर ठेवलं. पण त्याचबरोबर बेन स्टोक्स इंग्लंडसाठी व्हिलनही ठरला.
2016 - Ben Stokes bowled the final ball of the T20 World Cup.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 13, 2022
2022 - Ben Stokes hit the winning runs of the T20 World Cup. pic.twitter.com/azJvdvbgmP
2019 वर्ल्ड कपचा हीरो स्टोक्स त्या एका पराभवानं स्टोक्सची कारकीर्द ढवळून निघाली होती. पण इंग्लंड क्रिकेट बोर्डानं त्याच्यावर विश्वास दाखवला. तोच विश्वास त्यानं 2019 च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये सार्थ ठरवला. त्यानं फायनलमध्ये एकाकी झुंज देत इंग्लंडला विजयाकडे नेलं. टाय झालेल्या त्या मॅचमध्ये इंग्लंड सर्वाधिक बाऊंड्रीजच्या निकषावर विजेती ठरली. पण त्या विजयाचा एकमेव हीरो ठरला तो बेन स्टोक्स.
2016 ➡️ 2019 ➡️ 2022
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 13, 2022
Ben Stokes, TAKE A BOW.#PAKvENG #T20WorldCup pic.twitter.com/4heOtyFQ29
मेलबर्नवर मॅजिकल इनिंग याच स्टोक्सनं आज मेलबर्नवर पुन्हा एकदा मॅजिकल इनिंग केली. पाकिस्तानी तोफखान्यासमोर इंग्लंडचा संघ गडबडला होता. पण स्टोक्सनं शांतपणे डाव पुढे नेला. शाहीन आफ्रिदीचं मैदानाबाहेर जाणं आणि इफ्तिकार अहमद या नव्या बॉलरकडे बाबरनं दिलेली जबाबदारी ही स्टोक्ससमोर गिअर चेंज करण्याची एक मोठी संधी ठरली. आणि त्याचा त्यानं पुरेपूर फायदा घेतला. स्टोक्स पुन्हा इंग्लंडच्या विजयाचा हीरो ठरला. या दोन्ही मॅचमधली स्टोक्सची कामगिरी क्रिकेट विश्वात दीर्घकाळ स्मरणात राहणारी ठरेल.