पोलंड फुटबॉल टीमच्या मागे लढाऊ विमानं
दोहा, 18 नोव्हेंबर: कतारमध्ये आयोजित फिफा वर्ल्ड कपसाठी अनेक संघ सध्या दाखल होत आहेत. जगातल्या 32 देशांमध्ये फिफा वर्ल्ड कपसाठीचा हा महासंग्राम रंगणार आहे. त्यासाठी कतार सज्ज झालं आहे. पण आज कतारमध्ये दाखल होणाऱ्या एका संघाच्या बाबतीत अनोखी घटना घडली. पोलंड फुटबॉल टीम वर्ल्ड कपसाठी कतारला रवाना झाली. पण त्याचवेळी त्यांच्या विमानामागे फायटर जेट्सचा ताफा होता. पण खेळाडूंच्या विमानामागे लढाऊ विमानं का? असा प्रश्न अनेकांना पडला जेव्हा त्यांनी यासंदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियात पाहिला. तर त्यामागचं कारण होतं रशिया-युक्रेनमधलं युद्ध. युद्धामुळे पोलिश खेळाडूंना संरक्षण युद्धग्रस्त युक्रेनच्या सीमा पोलंडला लागून आहेत. त्यात मंगळवारी रशियानं केलेल्या हल्ल्यात एक मिसाईल पोलंडच्या सीमेलगत असलेल्या एका गावात येऊन धडकली. त्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे सुरक्षेसाठी पोलंड संघाला फायटर जेट्स विमानांनी एस्कॉर्ट केलं. पोलंड संघ असलेल्या विमानाच्या मागे ही दोन लढाऊ विमानं होती. पोलंड संघाच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन याचा एक व्हिडीओही शेअर करण्यात आला जो सध्या सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आहे.
लेव्हान्डोस्कीचा संघ वर्ल्ड कप मिशनवर दरम्यान जगातला स्टार फुटबॉलर रॉबर्ट लेव्हान्डोस्कीच्या नेतृत्वात पोलंडची टीम कतारमध्ये पोहोचली आहे. 1986 नंतर पहिल्यांदा बाद फेरी गाठण्याचा पोलंड संघाचा प्रयत्न राहील. पोलंडचा पहिला सामना 22 नोव्हेंबरला मेक्सिकोशी होणार आहे.