श्रेयस अय्यरला नशीबाची साथ
ऑकलंड, 25 नोव्हेंबर: ऑकलंड वन डेत दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्ध 7 बाद 306 धावांचा डोंगर उभारला. कॅप्टन शिखर धवनची आणि शुभमन गिलची शतकी सलामी आणि त्यानंतर श्रेयस अय्यरच्या दणकेबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियानं 300 धावांचा टप्पा ओलांडला. धवननं वन डे क्रिकेटमधला आपला फॉर्म कायम ठेवताना 72 धावा फटकावल्या. तर शुभमन गिलनंही 50 धावांची खेळी साकारली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर श्रेयस अय्यरला नशीबाची साथ मिळाली आणि त्यानं 80 धावांचं योगदान दिलं.
अय्यरला नशीबाची साथ श्रेयस अय्यर आज मैदानात उतरला तो नशीबाची साथ घेऊनच. श्रेयस अय्यरला आजच्या सामन्यात एक दोन नव्हे तर तब्बल तीन वेळा जीवदान मिळालं. याचा पूरेपूर फायदा उठवताना त्यानं 76 बॉलमध्ये 4 फोर आणि 4 सिक्सर्ससह 80 धावांची खेळी केली. पहिला चान्स अय्यरला पहिला चान्स मिळाला तो 27 व्या ओव्हरमध्ये. अॅडम मिल्नेच्या बॉलिंगवर अय्यरविरोधात LBW साठी अपील झाली. आणि अम्पायरनं ती फेटाळून लावली. न्यूझीलंडनं रिव्ह्यू घेतला. त्यावेळी बॉल स्टंपला स्पर्श करुन जात असल्याचं दिसत होतं. पण अम्पायर्स कॉल आल्यानं अय्यर त्यावेळी वाचला. तेव्हा तो अवघ्या 7 धावांवर खेळत होता. हेही वाचा - Ind vs NZ ODI: दहावीतूनच सोडलं शिक्षण… पण आज मिळाली टीम इंडियाची वन डे कॅप! पाहा ‘या’ खेळाडूची सक्सेस स्टोरी दुसरा चान्स त्यानंतर 31 व्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा विकेट किपर टॉम लॅथमनं अय्यरला दुसरा चान्स दिला. पुन्हा मिल्नेच्याच बॉलिंगवर अय्यरचा अप्पर कटचा प्रयत्न फसला आणि बॉल विकेट किपरच्या दिशेनं गेला. पण लॅथमला हा कॅच पकडता आला नाही. त्यावेळी अय्यर 11 धावांवर होता. तिसरा चान्स त्यानंतर 38 व्या ओव्हरमध्ये साऊदीच्या बॉलिंगवर मोठा फटका खेळण्याच्या नादात अय्यरचा बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं कॅच उडाला. पण यावेळीही फिन अॅलननं त्याला जीवदान दिलं. अय्यरच्या खात्यात तेव्हा 32 धावा जमा होता. त्यानंतर मात्र श्रेयस अय्यरनं टॉप गिअर टाकला आणि अर्धशतक झळकावलं. वन डे कारकीर्दीतलं अय्यरचं 13 वं अर्धशतक ठरलं.
न्यूझीलंडला 307 धावांचं आव्हान दरम्यान धवन, अय्यर आणि गिल यांच्या अर्धशतकांनंतर संजू सॅमसन (36) आणि वॉशिंग्टन सुंदरच्या (37) फटकेबाजीच्या जोरावर 50 ओव्हर्समध्ये 7 बाद 306 धावा स्कोअर बोर्डवर लावल्या.