लोकेश राहुल पुन्हा फ्लॉप
अॅडलेड, 10 नोव्हेंबर: इंग्लंडविरुद्ध टीम इंडियानं सेमी फायनलच्या मुकाबल्यात आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. पण या मोठ्या सामन्यात टीम इंडियाचा एक खेळाडू पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. मोठ्या टीमविरुद्ध भारताच्या या भरवशाच्या खेळाडूनं निराशा केली आणि टीकेचा धनी ठरला. हा खेळाडू आहे टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुल. लोकेश राहुलनं सेमी फायनल मुकाबल्यात भारताच्या डावाची सुरुवात केली. पण तो दुसऱ्याच ओव्हरमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतला. टॉप टीमविरुद्ध राहुल फ्लॉप गेल्या टी20 वर्ल्ड कपपासून लोकेश राहुल अव्वल संघांविरुद्ध सातत्यानं फ्लॉप ठरत आहे. यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वे आणि बांगलादेशविरुद्ध त्यानं अर्धशतकं झळकावली. पण पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका इतकच नव्हे तर नेदरलँडविरुद्धही त्याला दुहेरी धावा करता आल्या नाहीत. हाच राहुल आज सेमी फायनलमध्येही केवळ 5 धावाच करु शकला.
लोकेश राहुलची टॉप टीमविरुद्ध कामगिरी (टी20 वर्ल्ड कप) 3 (8) वि. पाकिस्तान, दुबई 18 (16) वि. न्यूझीलंड, दुबई 4 (8) वि. पाकिस्तान, मेलबर्न 9 (14) वि. दक्षिण आफ्रिका, पर्थ 5 (5) वि. इंग्लंड