मेसीचा गोल... अर्जेन्टिना विजयी
लुसेल-कतार, 27 नोव्हेंबर: सौदी अरेबियाविरुद्ध झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर अर्जेन्टिनानं दुसऱ्या मॅचमध्ये मात्र दमदार कमबॅक केलं. कतारच्या लुसेल स्टेडियमवर शनिवारी मध्यरात्री अर्जेन्टिना आणि मेक्सिको संघातला सामना पार पडला. या सामन्यात अर्जेन्टिनानं मेक्सिकोचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. अर्जेन्टिनाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला तो स्टार फुटबॉलर लायनल मेसीनं. मेसीच्या गोलमुळे अर्जेन्टिनाला मॅचमध्ये आघाडी मिळाली आणि त्यानंतर एन्जो फर्नांडेजनं गोल करत ही आघाडी 2-0 अशी वाढवली.
मेसीची जादू कायम अर्जेन्टिना-मेक्सिको सामन्यासाठी लुसेल स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. सौदी अरेबियाविरुद्ध पराभव झाल्यानं अर्जेन्टिनासाठी हा करो या मरोचा सामना होता. पण तरीही दोन वेळा वर्ल्ड कप विजेत्या अर्जेन्टिनानं तो दबाव झुगारुन मेक्सिकोला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवलं. लायनल मेसीनं 64व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. मग युवा एन्जो फर्नांडेजच्या गोलनं अर्जेन्टिना मोठ्या फरकानं विजयी ठरली. या सामन्यासाठी अर्जेन्टिनानं टीममध्ये तब्बल 5 बदल केले होते. यावरुन अंदाज येईल की अर्जेन्टिनासाठी हा सामना किती महत्वाचा होता. पहिल्याच सामन्यात सौदीनं अर्जेन्टिनाला 2-1 ने हरवलं होतं. त्या मॅचमध्येही अर्जेन्टिनाकडून एकमेव गोल केला तो मेसीनंच.
हेही वाचा - Ind vs NZ ODI: अरे हे कसलं सिलेक्शन? एक मॅच खेळवून ‘या’ खेळाडूवर पुन्हा अन्याय, चाहत्यांचा संताप अर्जेन्टिना नंबर दोनवर मेक्सिकोवरील विजयासह अर्जेन्टिना ग्रुप सीमध्ये दुसऱ्या नंबरवर पोहोचली आहे. अर्जेन्टिनाच्या खात्यात दोन मॅचमध्ये तीन पॉईंट्स आहेत. तर या ग्रुपमध्ये पोलंड 4 पॉईंट्ससह पहिल्या नंबरवर आहे.