JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Cricket: रोहितला काढा, 'या' खेळाडूला करा कॅप्टन; माजी निवड समिती सदस्याचा रोकठोक सल्ला

Cricket: रोहितला काढा, 'या' खेळाडूला करा कॅप्टन; माजी निवड समिती सदस्याचा रोकठोक सल्ला

Cricket: हार्दिकनं रोहितच्या अनुपस्थितीत याआधीही टीम इंडियाची कमान सांभाळली होती. पण वर्ल्ड कपमधल्या अपयशानंतर त्याच्याकडे नियमित कॅप्टन म्हणून पाहिलं जाण्याची शक्यता आहे.

जाहिरात

रोहित शर्मा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 नोव्हेंबर: टीम इंडियाच्या वर्ल्ड कप सेमी फायनलमधल्या लाजिरवाण्या पराभवानंतर आता आजी माजी खेळाडूंसह अनेकांकडून सडकून टीका होतेय. त्याचबरोबर बीसीसीआयला सल्लेही दिले जात आहेत. 1983 च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य आणि बीसीसीआयचे माजी निवड समिती अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी रोकठोक सल्ला दिला आहे. श्रीकांत यांच्या मते आता रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्याला नियमित टी20 कर्णधार करावं. मी सिलेक्टर असतो तर… श्रीकांत यांनी एका स्पोर्ट्स शोदरम्यान याविषयी भाष्य केलंय. त्यांनी म्हटलंय की मी निवड समिती अध्यक्ष असतो तर माझ्या मते हार्दिक पंड्या 2024 साली टी20 वर्ल्ड कपचा कॅप्टन असेल. आतापासूनच एक नवा संघ तयार करायला हवा आणि वर्ल्ड कपची मोर्चेबांधणी सुरु करायला हवी. ही महत्वाची गोष्ट आहे की वर्ल्ड कपची तयारी दोन वर्षांआधीपासूनच सुरु व्हायला हवी.

हेही वाचा -  IPL 2023: ‘पालघर एक्स्प्रेस’ दिल्लीहून नव्या स्टेशनकडे रवाना… पाहा ऑक्शनआधी कुणी केलं ट्रेड? न्यूझीलंड दौऱ्यावर हार्दिक कॅप्टन दरम्यान आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी बीसीसीआयनं हार्दिक पंड्याकडे टीम इंडियाची धुरा सोपवली आहे. किवींविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी हार्दिक भारतीय संघाचा कॅप्टन असेल. याआधीही हार्दिकनं रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची कमान सांभाळली होती. पण वर्ल्ड कपमधल्या अपयशानंतर त्याच्याकडे नियमित कॅप्टन म्हणून पाहिलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान 18 नोव्हेबरपासून भारत आणि न्यूझीलंड टी20 मालिकेला सुरुवात होईल.

हेही वाचा -  IPL 2023: वर्ल्ड कप गाजवणारे खेळाडू IPL मध्ये होणार मालामाल, पाहा कुणाला लागू शकते सर्वाधिक बोली? टी20 मालिकेचं वेळापत्रक 18 नोव्हेंबर, पहिली टी20 - वेलिंग्टन 20 नोव्हेंबर, दुसरी टी20 - माऊंट माँगानुई 22 नोव्हेंबर, तिसरी टी20 - नेपियर भारताचा टी20 संघ - हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), ईशान किशन, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या