JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022: हुश्श...पोहचला एकदा Moeen Ali, स्पर्धेपूर्वी CSK ला मिळाला मोठा दिलासा

IPL 2022: हुश्श...पोहचला एकदा Moeen Ali, स्पर्धेपूर्वी CSK ला मिळाला मोठा दिलासा

आयपीएल (IPL2022) 15 व्या सिझनच्या सुरुवातीला केवळ काही तास उरले आहेत. अशातच आयपीएलच्या जगताता अनेक घडामोडी घडत आहेत. पहिला सामना गतविजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट राइडर्स (KKR) यांच्यात खेळवला जाणार असून सामन्यापूर्वी चेन्नईसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

जाहिरात

Moeen Ali

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 मार्च: आयपीएल (IPL2022) 15 व्या सिझनच्या सुरुवातीला केवळ काही तास उरले आहेत. अशातच आयपीएलच्या जगताता अनेक घडामोडी घडत आहेत. पहिला सामना गतविजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट राइडर्स (KKR) यांच्यात खेळवला जाणार असून सामन्यापूर्वी चेन्नईसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अली**(Moeen Ali**) भारतात आला असून सीएसके संघात तो सहभागी झाला आहे. फ्रेंचायझीनेही या अष्टपैलू खेळाडूचा फोटो शेअर करून शिबिरात सामील झाल्याची अधिकृत माहिती दिली. भारतात पोहोचल्यानंतर त्याला 3 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. ऋतुराज गायकवाड, एमएस धोनी, रवींद्र जडेजा या चार खेळाडूंपैकी मोईन अली एक आहे, ज्यांना सीएसकने कायम ठेवले होते. IPL 2022: CSK क्विन्सचा थाट भारी! मैदानात आणि राजकारणात दोन्हीकडे सुपरहिट

संबंधित बातम्या

जेतेपद मिळवण्यात मोईन अलीचे मोलाचे योगदान सीएसकेला गेल्या मोसमात विजेतेपद मिळवून देण्यात मोईनचे मोठे योगदान होते. त्याने 15 सामन्यात 25.50 च्या सरासरीने 357 धावा केल्या, त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. तेथे त्याने 6 विकेट्सही घेतल्या. IPL सामन्यादरम्यान या ‘Mystery Girls’ रातो रात बनल्या स्टार्स, पाहा PHOTO सुरेश रैना आता संघाचा भाग नाही. अशा स्थितीत मोईन अली तिसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. तो सीएसकेच्या दुसऱ्या सामन्यापासून निवडीसाठी उपलब्ध होईल. चेन्नईचा दुसरा सामना 31 मार्च रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या