टीम इंडिया
अॅडलेड, 10 नोव्हेंबर: भारत आणि इंग्लंड संघात सध्या टी20 वर्ल्ड कपचा सेमी फायनलचा सामना सुरु आहे. पण या मॅचचा रिझल्ट पहिला बॉल पडण्यापूर्वीच लागला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याचं कारण आहे अॅडलेडच्या मैदानातला एक रेकॉर्ड. आणि त्यामुळेच रोहित शर्माच्या टीम इंडियाचा फायनलचा मार्ग मोकळा झाला अशी चर्चा सुरु झाली आहे. अॅडलेडमध्ये टॉस आणि जिंकणारी टीम यांचं एक वेगळंच गणित आहे. आणि त्यावरुनच भारताचा विजय निश्चित मानला जात आहे. अॅडलेड आणि टॉस आतापर्यंत ऑस्ट्रेलियातल्या अॅडलेड ओव्हल मैदानावर 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. पण आश्चर्याची गोष्ट ही की यातल्या प्रत्येक सामन्यात टॉस जिंकलेल्या टीमचा पराभव झाला आहे. त्यामुळे अॅडलेड ओव्हलवर मॅच जिंकण्यासाठी एका अर्थानं रोहित शर्मानं टॉस न जिंकलेलच बरं असं मानलं जात होतं. महत्वाची बाब ही की भारताचा बांगलादेशविरुद्धचा सामना अॅडलेडच्या मैदानातच झाला होता. त्या मॅचमध्ये पहिल्यांदा रोहित टॉस हरला आणि भारतानं ती मॅच जिंकली.
इंग्लंडनं जिंकला टॉस आजच्या सामन्यात इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरनं टॉस जिंकला. इंग्लंड यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये फेव्हरेट असली तरी टीम इंडियाही तुल्यबळ संघ आहे. पण अॅडलेड आणि टॉसचं नातं पाहता बटलरसाठी ही धोक्याची घंटा ठरु शकते.
राहुल पुन्हा अपयशी दरम्यान सेमी फायनलच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुल 5 धावांवर बाद झाला. महत्वाच्या सामन्यात राहुलची अपयशाची मालिका कायम राहिली.