ख्राइस्टचर्च, 30 नोव्हेंरबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 219 धावा केल्या असून न्यूझीलंडना जिंकण्यासाठी 220 धावांची गरज आहे. या सामन्यात भारतीय फलंदाज दीपक हुड्डा खेळत असताना गोलंदाज टीम साउदीने त्याच्या चेंडूवर अपील केलं नाही. तसंच टॉम लॅथमनेसुद्धा चेंडू पकडल्यानतंर काहीच रिअॅक्शन दिली नाही. गोलंदाजही आश्चर्यचकीत होता की चेंडू बॅटला का लागला नाही, मात्र यष्टीरक्षकाची प्रतिक्रिया सामान्य होती. पण कव्हरला उभा असलेल्या कर्णधार केन विल्यम्सनला थोडा आवाज ऐकू आला आणि अखेरच्या काही सेकंदात त्याने डीआरएस घेतला. मैदानावरील पंचांनासुद्धा वाटलं नाही की चेंडू बॅटला लागून गेला आहे. कारण त्याचा मोठा आवाज आला नव्हता. दरम्यान, केन विल्यम्सनने डीआरएस कॉल घेतला आणि तिसऱ्या पंचांनी अल्ट्राएजमध्ये पाहिलं. तेव्हा चेंडू बॅटला लागत असल्याचं दिसलं आणि दीपक हुड्डाला बाद देण्यात आलं. हेही वाचा : वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी पण इतरांचं काय? तिसऱ्या वन डे टीम इंडियाची पाहा काय झाली अवस्था दीपक हुड्डाला गेल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलं होतं. त्याला संजू सॅमसनच्या जागी संधी मिळाली होती, मात्र त्याला फलंदाजी करायला मिळाली नव्हती. या सामन्यातही तो स्वस्तात बाद झाला. दीपक हुड्डाने 25 चेंडूत फक्त 12 धावा केल्या. 34 व्या षटकात चौथ्या चेंडूवर तो टीम साउदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. हुड्डा फलंदाजी करताना फॉर्ममध्ये दिसत नव्हता. त्याला एकही चेंडू सीमेपार धाडता आला नाही.
हेही वाचा : ‘मी फक्त 24 वर्षांचा त्यामुळे…’ भारतीय खेळाडूच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांचा संताप, पाहा काय घडलं?
भारतीय फलंदाजांना ख्राइस्टचर्च वनडेत फारशी कमाल करता आली नाही. ठराविक अंतराने गडी बाद झाल्याने भारतीय संघ 219 धावांपर्यंतच मजल मारू शकला. वॉशिंग्टन सुंदरने 51 तर श्रेयस अय्यरने 49 धावांची खेळी केली. आघाडीच्या फलंदाजांना अपयश आले. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्ने आणि डेरिल मिशेल यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. त्यानंतर 220 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने 18 षटकात 1 बाद 104 धावा केल्या आहेत. आता पावसामुळे खेळ थांबला आहे.