मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs NZ ODI: 'मी फक्त 24 वर्षांचा त्यामुळे...' भारतीय खेळाडूच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांचा संताप, पाहा काय घडलं?

Ind vs NZ ODI: 'मी फक्त 24 वर्षांचा त्यामुळे...' भारतीय खेळाडूच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांचा संताप, पाहा काय घडलं?

रिषभ पंतच्या विधानावर चाहत्यांचा संताप

रिषभ पंतच्या विधानावर चाहत्यांचा संताप

Ind vs NZ ODI: रिषभ पंत अतिशय खराब फॉर्ममध्ये असूनही त्याला वारंवार संधी मिळत आहे. दुसरीकडे, संजू सॅमसन चांगल्या फॉर्ममध्ये असूनही बेंचवर बसलेला दिसत आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

ख्राईस्टचर्च, 30 नोव्हेंबर: क्रिकेट हा सर्वात अनिश्चिततेनं भरलेला खेळ समजला जातो. कधीकधी एक शॉट किंवा एक विकेट संबंधित खेळाडूला 'हिरो' होण्यास मदत करते तर कधीकधी एखादा कॅच सोडला तर तो व्हिलन ठरतो. आजच्या मॅचमध्ये जबदस्त फॉर्ममध्ये असलेला खेळाडू कधी आउट ऑफ फॉर्म होईल हे सांगता येत नाही. त्यामुळेच प्रत्येक क्रिकेटपटूनं फक्त आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असा सल्ला बहुतेक माजी खेळाडू देत असतात. मात्र, भारताचा तरुण खेळाडू असलेल्या रिषभ पंतवर या गोष्टीचा काहीही परिणाम होत नसल्याचं चित्र आहे. न्यूझीलंडविरुद्ध ख्राईस्टचर्च येथील वन-डे मॅचपूर्वी त्यानं आपल्या वक्तव्यातून हे सिद्ध केलं आहे. त्याच्या उद्धट वक्तव्यामुळे क्रिकेट फॅन्सनी पंतवर टीका सुरू केली आहे.

ख्राईस्टचर्च वन-डे सुरू होण्यापूर्वी रिषभ पंत म्हणाला की, तो फक्त 24 वर्षांचा आहे. कोणाशीही तुलना करणं त्याला आवडत नाही. जर चाहत्यांना त्याची तुलना करायची असेल तर तो 32 वर्षांचा झाल्यानंतर करावी. पंत ज्या पद्धतीने हे बोलला ते पाहून तो आतून संतापला होता असं दिसलं. वाईट फॉर्ममध्ये असूनही पंत काहीसा उद्धटपणे बोलला, हे बघून चाहते चांगलेच संतापले आहेत. आशिया कप, टी- 20 वर्ल्ड कप, न्यूझीलंड विरुद्ध टी- 20 सीरिजमध्ये अपयशी ठरल्यानंतर आता तो वन-डे सीरिजमध्येही अपयशी ठरला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचं रेकॉर्ड उत्कृष्ट असलं तरीही मर्यादित ओव्हर्स फॉरमॅट्समध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला आहे. गेल्या दोन महिन्यांत तो विशेष कामगिरी करू शकलेला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे सीरिजमधील शेवटच्या मॅचमध्येही त्याला केवळ 10 रन्स करता आले.

रिषभ पंतचा फ्लॉप शो

रिषभ पंतच्या बॅटमधून रन्स निघणं कठीण झालं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये त्याला पाच मॅचमध्ये केवळ 58 रन्स करता आले होते. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये त्यानं दोन मॅच खेळून 27 रन्स केले. आशिया कपमध्ये चार मॅच खेळून त्यानं फक्त 51 रन्स केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या आणखी एका टी-20 सीरिजमध्ये त्याने तीन मॅचेमध्ये 27 रन्स केले. टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याला दोन मॅचमध्ये संधी मिळाली. तेव्हा त्यानं फक्त नऊ रन केले. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये दोन मॅच खेळून त्याने 17 रन्स केले. आता न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्येही त्यानं तीन मॅच खेळून फक्त 35 रन्स केले आहेत.

हेही वाचा - Ind vs NZ ODI: वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी पण इतरांचं काय? तिसऱ्या वन डे टीम इंडियाची पाहा काय झाली अवस्था...

खराब फॉर्मनंतरही संधी

रिषभ पंत अतिशय खराब फॉर्ममध्ये असूनही त्याला वारंवार संधी मिळत आहे. दुसरीकडे, संजू सॅमसन चांगल्या फॉर्ममध्ये असूनही बेंचवर बसलेला दिसत आहे. सॅमसननं न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याला पुढील दोन मॅचसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. बांगलादेशविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्येही त्याची निवड झालेली नाही. पण, आउट ऑफ फॉर्म असलेल्या पंतचा टीममध्ये समावेश आहे. कमी वयाचा आधार घेऊन पंत आपली सुमार कामगिरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याच्या वक्तव्यांमधून दिसत आहे. त्याला मिळत असलेला सवलतींमुळेच तो असं बोलत आहे, असं चाहत्यांचं म्हणणं आहे.

हेही वाचा - Vijay Hajare Trophy: महाराष्ट्राचं रनमशिन... वर्ल्ड रेकॉर्डनंतर पठ्ठ्यानं अवघ्या तीन दिवसात ठोकलं दुसरं शतक

सोशल मीडियावर चाहत्यांनी केलं ट्रोल

रिषभ पंतला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. त्याला कशाचा अभिमान आहे, असं चाहते त्याला विचारत आहेत. 'त्याला असं वाटतं की 24 वर्षांचा असल्याने त्याला चुका करण्याचं स्वातंत्र्य आहे. असंच खेळत राहिल्यास वयाच्या 32व्या वर्षापर्यंत त्याला खेळताही येणार नाही,' असा इशारा चाहत्यांनी पंतला दिला आहे.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sports, Team india