मुंबई, 20 डिसेंबर : भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना २२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. रोहित शर्मा या कसोटीत अंगठ्याच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. अद्याप त्याची दुखापत बरी झाली नसल्याची माहिती बीसीसीआय़ने दिली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावेळी क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. रोहित शर्मा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकला नव्हता तर पहिल्या कसोटीतही तो संघात नव्हता. आता बीसीसीआयने त्याची दुखापत अद्याप पूर्ण बरी झाली नसल्याचं म्हटलं आहे. रोहित शर्माशिवाय नवदीप सैनीसुद्धा दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे.
रोहित शर्माच्या दुखापतीबाबत डॉक्टरांच्या टीमचे म्हणणे आहे की, दुखापत पूर्णपणे बरी होण्यास अद्याप काही वेळ लागेल. त्याच्यावर उपचार सुरू असून बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत तो खेळू शकणार नाही. तर नवदीप सैनीच्या पोटाचे स्नायू ताणल्याने दुसऱ्या कसोटीला तो मुकला आहे. आता तोसुद्धा उपचारासाठी रवाना होईल. हेही वाचा : मेस्सीची हटके लव्हस्टोरी, बचपन का प्यार; दुराव्यानंतर एका अपघातामुळे पुन्हा आले एकत्र रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत खेळल्यास निवड समितीसमोर कुणाला बाहेर काढायचं असा प्रश्न होता. पण सध्या हा प्रश्न उरलेला नाही. पहिल्या कसोटीत फलंदाजांसोबत गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे खेळाडुंना बाहेर ठेवण्याचा निर्णय कठीण बनला होता. भारताने पहिली कसोटी 188 धावांनी जिंकली. यात शुभमन गिलने पहिलं कसोटी शतक केलं होतं तर पुजाराने वेगवान खेळी करत शतक झळकावलं होतं. दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ - केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यु ईश्वरन, सौरभ कुमार, जयदेव उनादकट