JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs Aus: तीन वर्षांपासून संघाबाहेर, फक्त 7 टी-20 सामने; अचानक रोहितच्या टीममध्ये केली एंट्री

Ind vs Aus: तीन वर्षांपासून संघाबाहेर, फक्त 7 टी-20 सामने; अचानक रोहितच्या टीममध्ये केली एंट्री

कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्याने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या तीन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. जवळपास एका महिन्यात टीम इंडियाच्या सदस्याला कोविड-19 चा सामना करावा लागण्याची ही दुसरी वेळ आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्याने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या तीन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. 20 सप्टेंबर रोजी होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शमीचे खेळणे जवळपास निश्चित होते. परंतु, कोरोनाची लागण झाली असल्यामुळे तो मोहालीला संघासोबत प्रवासही करू शकला नाही. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने पीटीआयला सांगितले की, “मोहम्मद शमी COVID-19 पॉझिटिव्ह आहे. लक्षणे सौम्य असल्याने काळजी करण्यासारखे काही नाही. परंतु, त्याला विलगीकरणात राहावे लागेल आणि कोविडमधून बरा झाल्यानंतर पुन्हा संघात सामील होऊ शकेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी शमी तंदुरुस्त होईल, अशी आम्हाला आशा आहे. उमेश यादवची संघात एंट्री - मोहम्मद शमीच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवचा ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. 34 वर्षीय उमेश यादव मांडीच्या दुखापतीमुळे उपचार घेत होता. उमेश यादवने फेब्रुवारी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय खेळला. म्हणजेच आता तो दोन वर्षांहून अधिक कालावधीनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी संधी मिळूनही, उमेश आयपीएलचा नियमित भाग आहे आणि त्याने कोलकाता नाइट रायडर्स (KKR) साठी गेल्या मोसमात 16 विकेट्स घेतल्या आहेत. उमेश यादवने भारतासाठी आतापर्यंत फक्त 7 टी-20 सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर एकूण 9 विकेट आहेत. शमीते पुनरागमन कोविडने रोखले - मोहम्मद शमीचे प्रदीर्घ कालावधीनंतर भारताच्या टी-20 संघात पुनरागमन झाले. यापूर्वी शमीने शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना गेल्या वर्षीच्या विश्वचषकात खेळला होता. पण आता कोविड-19 ने त्याच्या परतीला ब्रेक लावला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी शमी तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे. शमीची T20 विश्वचषकासाठी स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती, त्यामुळे त्याला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाला जावे लागणार आहे. गेल्या महिन्यात द्रविडलाही कोरोना - जवळपास एका महिन्यात टीम इंडियाच्या सदस्याला कोविड-19 चा सामना करावा लागण्याची ही दुसरी वेळ आहे. विशेष म्हणजे आशिया चषक 2022 च्या आधी, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आणि त्याला यूएईला जाण्यास विलंब झाला. द्रविडला कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आणि अखेरीस तो पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या सलामीच्या सामन्यापूर्वी संघात सामील झाला. हे वाचा -  वर्ल्ड कपआधी टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान, पाहा मालिकेचं संपूर्ण टाईमटेबल ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह. हे वाचा -  Engineer ते टीम इंडियाचा स्टार बॉलर, प्रेरणा देणारा आर अश्विनचा रंजक प्रवास भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वेळापत्रक: पहिला T20 - 20 सप्टेंबर (मोहाली) दुसरा T20 - 23 सप्टेंबर (नागपूर) तिसरा T20 - 25 सप्टेंबर (हैदराबाद)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या