जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs Aus: वर्ल्ड कपआधी टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान, पाहा मालिकेचं संपूर्ण टाईमटेबल

Ind vs Aus: वर्ल्ड कपआधी टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान, पाहा मालिकेचं संपूर्ण टाईमटेबल

भारत वि. ऑस्ट्रेलिया टी20

भारत वि. ऑस्ट्रेलिया टी20

Ind vs Aus: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आगामी टी20 वर्ल्ड कप आधी आमनेसामने येणार आहेत. उभय संघातली तीन टी20 सामन्यांची मालिका 20 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 सप्टेंबर**:** भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आगामी टी20 वर्ल्ड कप आधी आमनेसामने येणार आहेत. उभय संघातली तीन टी20 सामन्यांची मालिका 20 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मंगळवारी मोहालीत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातला पहिला टी20 मुकाबला खेळवला जाईल. दुसरा सामना 23 सप्टेंबरला नागपुरात तर तिसरा सामना 25 सप्टेंबरला हैदराबादमध्ये होईल. रोहित शर्माची टीम इंडियाला वर्ल्ड कप मोहिमेआधी या मालिकेत चांगलाच सराव मिळेल. ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरला विश्रांती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियानं मात्र स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरला विश्रांती दिली आहे. तर ऑलराऊंडर मिचेल मार्श, मार्कस स्टॉयनिस आणि मिचेल स्टार्क दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नाहीत. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचं वेळापत्रक 20 सप्टेंबर, पहिला टी20 सामना – मोहाली 23 सप्टेंबर, दुसरा टी20 सामना – नागपूर 25 सप्टेंबर, तिसरा टी20 सामना – हैदराबाद भारत-ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यांना किती वाजता सुरुवात होईल**?** उभय संघातले तिन्ही सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होतील भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचं लाईव्ह टेलिकास्ट कोणत्या चॅनेलवरुन केलं जाईल**?** ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका स्टार स्पोर्टसवर तुम्ही पाहू शकता. तर याचं लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने हॉटस्टारवर पाहता येणार आहे. हेही वाचा -  Cricket: क्रिकेटर बनला ‘बाहुबली’, मास्टर ब्लास्टर सचिनही याच्या बॉडीवर फिदा भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेट कीपर), दिनेश कार्तिक (विकेट कीपर), हार्दिक पंड्या, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह. ऑस्ट्रेलियन संघ- अॅरॉन फिंच (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरुन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झॅम्पा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात