मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Engineer ते टीम इंडियाचा स्टार बॉलर, प्रेरणा देणारा आर अश्विनचा रंजक प्रवास

Engineer ते टीम इंडियाचा स्टार बॉलर, प्रेरणा देणारा आर अश्विनचा रंजक प्रवास

Engineer ते टीम इंडियाचा स्टार बॉलर, आर अश्विनबद्दल रंजक गोष्टी तुम्हाला माहितीय का?

Engineer ते टीम इंडियाचा स्टार बॉलर, आर अश्विनबद्दल रंजक गोष्टी तुम्हाला माहितीय का?

Engineer ते टीम इंडियाचा स्टार बॉलर, आर अश्विनबद्दल रंजक गोष्टी तुम्हाला माहितीय का?

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई : भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत. सुनील गावस्कर, कपिल देव (Kapil Dev), बिशनसिंग बेदी (Bishan Singh Bedi) यांच्यासारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत: चा ठसा उमटवला आहे. भारतीय स्पिन बॉलर्सचा दबदबा इतका होता की वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनच्या मनात त्यांचं नाव ऐकलं तरीही धडकी भरायची.

  बिशनसिंग बेदी, चंद्रशेखर यांनी टाकलेला बॉल वळून कुठल्या बेसावध क्षणी बॅट्समनला बोल्ड करेल याचा अंदाजच यायचा नाही. यांचा वारसा पुढे अनिक कुंबळेनी चालवला आणि त्यानंतर आता आर. अश्विन (R. Ashwin) स्पिन म्हणजे फिरकी बॉलिंगला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आहे.

  अश्विनचा आज (17 सप्टेंबर 22) 36 वा वाढदिवस आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा दुसरा सगळ्यात यशस्वी बॉलर ही अश्विनची ओळख आहे. टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2022) संघातही अश्विन आहे.

  खेळात प्रवीण खेळाडूंची शिक्षणात फार प्रगती दिसत नाही. पण क्रिकेटच्या मैदानावर जसं अश्विन अव्वल आहे तसंच त्याने शिक्षणाच्या मैदानातही दमदार कामगिरी केली आहे.

  तो इंजिनीअर (Engineer) आहे. अगदी मोजकेच खेळाडू अशी दुहेरी कामगिरी करू शकले आहेत. त्याचबरोबर टेस्ट क्रिकेटमध्ये अश्विनने 442 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय माजी कॅप्टन आणि फास्ट बॉलर कपिल देव यांच्या कसोटी विकेट्सचा विक्रमही अश्विनने मोडला आहे.

  मूळचा तमिळनाडूचा (Tamilnadu) असलेल्या अश्विनने सुरुवातील फास्ट बॉलर म्हणून क्रिकेट करिअर सुरू केलं होतं तसंच तो ओपनिंगला बॅटिंग करायचा.

  काही काळाने त्याने फास्टऐवजी स्पिन बॉलिंग सुरू केली. टेस्ट (Test Cricket) क्रिकेटमध्ये सगळ्यात कमी डावांत अनुक्रमे 50, 100, 150 आणि 400 विकेट्स घेण्याचा विक्रम अश्विनच्या नावे आहे. आयसीसीने 2016 मध्ये अश्विनला ‘क्रिकेटर ऑफ द ईयर’ हा सन्मान दिला होता. हा बहुमान मिळवणारा तो त्या वेळेस केवळ तिसरा भारतीय खेळाडू होता.

  हे नाही जमलं कुणाला

  टेस्ट क्रिकेटमध्ये अश्विनने तीनवेळा एकाच मॅचमध्ये शतकही केलंय आणि 5 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याची ही कामगिरी खूप कमी जणांना साधली आहे. तसं करणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटर आहे. 2016 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये (T-20 Cricket) 50 विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय बॉलर ठरला.

  टी-20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग या स्पर्धां जिंकणाऱ्या भारतीय टीममध्ये अश्विनचा समावेश होता. आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत तो अनेक वर्षं चेन्नई सुपरकिंग्जकडून (Chennai Super Kings) खेळला आहे.

  त्याने 30 वेळा घेतल्यात 5 विकेट्स

  अश्विननी 86 टेस्टमध्ये 24 च्या सरासरीने 442 विकेट्स घेतल्या आहेत. एका मॅचमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने 30 वेळा करून दाखवली आहे. तसंच एकाच मॅचमध्ये 10 विकेट्स घेण्याची कामगिरीही त्याने 7 वेळा केली आहे.

  5 शतकं आणि 12 अर्धशतकं यांच्या सहाय्याने त्याने 2931 रन्सही केल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक म्हणजे 619 विकेट्स अनिल कुंबळेनी घेतल्या आहेत त्यानंतर अश्विनचा नंबर लागतो. त्याने 434 विकेट्स घेतल्या आहेत. मार्च 2022 मध्ये अश्विनने कपिल देव यांचा विक्रम मोडून दुसरं स्थान पटकावलं आहे.

  अश्विनने भारताकडून 113 वन-डेंमध्ये 151 आणि 56 टी-20 मॅचेसमध्ये 66 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर अश्विनने 287 मॅचमध्ये 281 बळी घेतले आहेत. 8 रन देऊन 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. अश्विनने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 684 विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतही आपल्या स्पिनची जादू दाखवेल अशी अपेक्षा आपण करूया.

  First published:
  top videos

   Tags: R ashwin, Success story, Team india