JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सूर्या पुन्हा तळपला, T20 मधला सगळ्यात मोठा पुरस्कार पटकवला!

सूर्या पुन्हा तळपला, T20 मधला सगळ्यात मोठा पुरस्कार पटकवला!

सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये अनेक विक्रम मोडीत काढून फॉरमॅटमध्ये यापूर्वी कधीही न केलेला बेंचमार्क प्रस्थापित केला. 2022 च्या T20 फॉरमॅट मध्ये 1 हजार हून अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जानेवारी : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला आयसीसी पुरूष T20 क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सूर्यकुमार याला प्रथमच हा पुरस्कार जाहीर झाला असून त्याची 2022 ची टी 20 मधील कारकीर्द जगातील इतर क्रिकेटर्सच्या तुलनेत अव्वल ठरली आहे. ICC 2022 चे पुरस्कार 24 जानेवारी पासून घोषित करण्यात येत आहेत. 26 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात 13 वैयक्तिक पुरस्कारांसह विविध श्रेणीतील विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. आज आयसीसीने पुरूष T20 क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर केला असून यासाठी भारताचा क्रिकेटर सूर्यकुमारची निवड करण्यात आली आहे. 2021 मध्ये हा आयसीसीने हा पुरस्कार पाकिस्तानचा क्रिकेटर मोहम्मद रिझवान याला जाहीर केला होता.

सूर्यकुमार यादव याने 2022 मध्ये 31 टी २० सामने खेळले असून यात 1 हजार 164 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 187.43 इतका होता. सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये अनेक विक्रम मोडीत काढले आणि फॉरमॅटमध्ये यापूर्वी कधीही न केलेला बेंचमार्क प्रस्थापित केला. 2022 च्या T20 फॉरमॅट मध्ये 1 हजार हून अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला.

सूर्याने वर्षभरात 68 षटकारांसह दोन शतके आणि नऊ अर्धशतके ठोकली आहेत. वर्षभरात सूर्यकुमारने मैदानावर अनेक खेळी केल्या परंतु इंग्लंड विरुद्ध त्याने केलेली खेळी ही अविस्मरणीय ठरली. सूर्याने या सामन्यात 55 चेंडूत 117 धावा करून त्याचे टी-20 मधील पहिले शतक झळकावले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या