ग्लेन मॅक्सवेल
मेलबर्न, 27 ऑक्टोबर: मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर आज टी20 वर्ल्ड कप मधले दोन सामने पावसानं वाया गेले. भारतीय वेळेनुसार सकाळच्या सत्रात आयर्लंड आणि अफगाणिस्तान संघातला सामना आधी रद्द झाला. त्यानंतर बराच वेळ वाट पाहूनही पाऊस न थांबल्यानं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सामन्यातही खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे चारही संघांना 1-1 पॉईंटवर समाधान मानावं लागलं. दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी मात्र ही बाब थोडीशी फायदेशीर ठरली. कारण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात निकाल जर ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं लागला नसता तर सेमीफायनलचे दरवाजे कांगारुंसाठी जवळपास बंद झाले असते. आणखी एक बाब अशी की या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडे नियमित विकेट किपर नव्हता. कारण विकेट किपर मॅथ्यू वेड ला कोरोना झाल्यानं तो या सामन्यात खेळण्याची शक्यता फारच कमी होती. मॅक्सवेलला करावी लागली असती किपिंग दरम्यान इंग्लंडविरुद्ध जर सामना झाला असता आणि मॅथ्यू वेड खेळला नसता तर या मॅचमध्ये डेव्हिड वॉर्नर किंवा ग्लेन मॅक्सवेलला विकेट किपिंग करावी लागली असती. याचं कारण ऑस्ट्रेलियाकडे केवळ एकच विकेट किपर आहे. ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कपसाठीच्या 15 सदस्यीय संघात याआधी जोश इंग्लिस या जादा विकेट किपरचा समावेश होता. पण प्रॅक्टिस मॅचवेळी त्याला दुखापत झाली आणि ऑस्ट्रेलियानं कॅमेरॉन ग्रीनला टीममध्ये घेतलं जो ऑल राऊंडर आहे.
त्यामुळे वॉर्नर किंवा मॅक्सवेल हे विकेट किपिंग करताना दिसले असते. याशिवाय कॅप्टन फिंचनंही डोमेस्टिक क्रिकेटमध्ये विकेट किपिंग केलेली आहे. पण काल प्रॅक्टिस सेशन दरम्यान मॅक्सवेल किपिंग करताना दिसला होता. तर कॅप्टन फिंचनं बोलताना सांगितलं होतं की गरज पडली तर वॉर्नरही विकेट किपिंग करु शकतो.
ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू कोरोनाबाधित मॅथ्यू वेड कोरोना झालेला ऑस्ट्रेलियाचा दुसरा खेळाडू ठरला. याआधी लेग स्पिनर अॅडम झॅम्पालाही वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यानंतर कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तो खेळला नाही. हेही वाचा - T20 World Cup: अमित मिश्राचं एक ट्विट अन् पाकिस्तानी ट्रोलर्सची फौज मिश्राजींच्या अंगावर, पाहा नेमकं काय घडलं… ‘ग्रुप ऑफ डेथ’मध्ये उलटफेर होणार? इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, अफगाणिस्तान अशा मातब्बर संघांचा भरणा असलेल्या टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप 1ला ग्रुप ऑफ डेथ असं म्हटलं गेलं आहे. या गटातून कोणता संघ सेमी फायनल गाठणार हे अद्याप तरी सांगता येण्यासारखं नाही. कारण पावसामुळे या ग्रुपमधील 4 सामने वाया गेले आहेत. त्यामुळे उर्वरित सामन्यांच्या निकालावरच टॉप 2 मध्ये कोण राहणार हे कळेल.