जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup: 'कोरोना झाला तरी मैदानात आला!', मास्क लावून खेळताना 'या' खेळाडूचे फोटो Viral

T20 World Cup: 'कोरोना झाला तरी मैदानात आला!', मास्क लावून खेळताना 'या' खेळाडूचे फोटो Viral

मॅथ्यू वेड

मॅथ्यू वेड

T20 World Cup: काल ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर बॅट्समन मॅथ्यू वेडला कोरोना झाला आणि ऑस्ट्रेलियन टीम चिंतेत पडली. वेडला कोरोनाची हलकी लक्षणं आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मेलबर्न, 27 ऑक्टोबर: गेली जवळपास दोन वर्ष कोरोनानं क्रीडाविश्वातही मोठा गोंधळ घातला होता. 2020 साली कोरोनामुळे ऑलिम्पिक आणि टी20 वर्ल्ड कप अशा मोठ्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या होत्या. 2021 मध्ये या स्पर्धा पार पडल्या पण त्या कोरोनाचे नियम आणि अटी पाळून. यूएईत गेल्या वर्षी पार पडलेली टी20 वर्ल्ड कप स्पर्धा बायो बबलमध्ये खेळवण्यात आली. तिथे प्रेक्षकांनाही एन्ट्री नव्हती. पण यंदा मात्र ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत आयसीसीनं खेळाडू आणि प्रेक्षकांनाही बायो बबलमुक्त केलं. पण त्यात ऑस्ट्रेलियाचा एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आणि मोठी खळबळ उडाली. अर्थात आता कोरोनाची तीव्रता तेवढी राहिली नसल्यानं आणि आयसीसीनं कोरोनासंदर्भातील नियमात बदल केल्यानं हा खेळाडू अजूनही ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रुममध्येच आहे. त्यामुळे आज तो मास्क लावून मैदानात उतरला आणि त्याची चांगलीच चर्चा झाली.

News18

मॅथ्यू वेडला कोरोना, तरीही मैदानात आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात सुपर 12 फेरीच्या ग्रुप 1 मधला सामना सामना होणार होता. पण मेलबर्नमधल्या या सामन्यात पावसानं वक्रदृष्टी फिरवली आणि हा सामना एकही बॉल न खेळता रद्द करण्यात आला. दरम्यान काल ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर बॅट्समन मॅथ्यू वेडला कोरोना झाला आणि ऑस्ट्रेलियन टीम चिंतेत पडली. वेडला कोरोनाची हलकी लक्षणं आहेत. त्यामुळे तो आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी मैदानातही दिसला. त्यावेळी त्यानं मास्क लावला होता. पण कोरोना झालेल्या वेडला मैदानात पाहून एकच चर्चा सुरु झाली.

जाहिरात

हेही वाचा -  T20 World Cup: वर्ल्ड कप खेळायला आले की वर्षा पर्यटनाला… मेलबर्नमध्ये नक्की चाललंय काय? ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू कोरोनाबाधित मॅथ्यू वेड कोरोना झालेला ऑस्ट्रेलियाचा दुसरा खेळाडू ठरला. याआधी लेग स्पिनर अॅडम झॅम्पालाही वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यानंतर कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तो खेळला नाही.

आयसीसीकडून नियम शिथिल दरम्यान कोरोनाबाबतच्या नियमात आयसीसीनं शिथिलता आणली आहे. लक्षणं सौम्य असतील तर खेळाडूला टीमसोबत राहण्याची इतकच नव्हे तर सामन्यात खेळण्याची मुभाही देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात