JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / FIFA WC 2022: केरळात फुटबॉल फॅन्सचा वेगळाच स्वॅग! अर्जेंटिना-ब्राझीलचे चाहते भिडले; हाणामारीचा Video Viral

FIFA WC 2022: केरळात फुटबॉल फॅन्सचा वेगळाच स्वॅग! अर्जेंटिना-ब्राझीलचे चाहते भिडले; हाणामारीचा Video Viral

FIFA WC 2022: केरळमध्ये सध्या फिफा वर्ल्ड कपचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पण याच उत्साहाला गालबोट लावणारी एक घटना नुकतीच केरळमध्ये घडली आहे.

जाहिरात

केरळमध्ये फुटबॉल चाहते भिडले

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

केरळ, 23 नोव्हेंबर: सध्या जगभरात फुटबॉल वर्ल्ड कपची क्रेझ आहे. कतारमध्ये सुरु असलेल्या या फिफा वर्ल्ड कपमध्ये भारत सहभागी झाला नसला तरी भारतातही फुटबॉलचे अनेक चाहते आहेत. भारतात गोवा, पश्चिम बंगाल आणि केरळ ही फुटबॉलप्रेमी राज्य मानली जातात. केरळमध्ये तर सध्या फिफा वर्ल्ड कपचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पण याच उत्साहाला गालबोट लावणारी एक घटना नुकतीच केरळमध्ये घडली आहे. केरळच्या कोल्लममध्ये हाणामारी मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी केरळच्या कोल्लममध्ये फिफा वर्ल्ड कपच्या उद्घाटनादिवशी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातल्या फुटबॉल प्रेमींनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. सगळ्या समर्थकांनी मिळून ओपनिंग सेरेमनी आणि पहिली मॅच पाहायचा प्लॅन होता. पण याच कार्यक्रमाआधी अर्जेन्टिना आणि ब्राझील टीमच्या समर्थकांमध्ये कोणत्या तरी कारणावरुन जुंपली. क्षुल्लक वादाचं हाणामारीत रुपांतर झालं. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा -  FIFA WC 2022: जोश आणि जल्लोष… सौदीत साजरी झाली दिवाळी, किंग सलमाननं केली ‘ही’ मोठी घोषणा

चाहत्यांवर पोलिसांची कारवाई दरम्यान या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप केला असता जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांकडूनही लाठीचार्ज करण्यात आला. इतकच नाही तर 22 जणांना अटकही करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या