मुंबई, 2 डिसेंबर : ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा स्टार ओपनर के.एल. राहुल पूर्णपणे अपयशी ठरलाय. आत्तापर्यंत झालेल्या तीन मॅचमध्ये त्याला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. त्याच्या वाईट कामगिरीवर टीका सुरू झाली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली राहुलच्या मदतीला धावून आला आहे. टीम इंडियाची आज ( 2 नोव्हेंबर) मॅच बांगलादेशशी होणार आहे. अॅडलेड ओव्हल मैदानावर विजय मिळवून सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशानेच टीम खेळेल. या मॅचपूर्वी माजी कॅप्टन विराट कोहली आणि राहुलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘झी न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पण, अद्याप टीम सेमीफायनलचं तिकीट पक्क करू शकलेली नाही. आत्तापर्यंत झालेल्या तिन्ही मॅचमध्ये टीमची ओपनिंग जोडी फारशी कमाल दाखवू शकलेली नाही. ओपनिंग जोडीपैकी रोहित शर्मानं चांगला खेळ केला आहे. मात्र, राहुल सातत्यानं अपयशी ठरला आहे. ही बाब लक्षात घेऊन विराट राहुलच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. अॅडलेडमध्ये झालेल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये विराट कोहलीनं राहुलला काही बॅटिंग टिप्स दिल्या.
राहुलचा फॉर्म चिंताजनक के. एल. राहुलनं टी-20 वर्ल्ड कपमधील तीन मॅचमध्ये फक्त 22 रन्स केले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध प्रत्येकी नऊ, तर पाकिस्तानविरुद्ध अवघ्या चार रन्स करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला होता. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत खराब कामगिरी केल्यामुळे राहुलला टीकेचा सामना करावा लागत आहे. रोहित आणि विराट पुढचा वर्ल्ड कप खेळणार का? BCCI कडून आलं स्पष्टीकरण भारत-बांगलादेश येणार आमने-सामने टीम इंडियानं टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत तीनपैकी दोन मॅच जिंकल्या आहेत. भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याआधी टीम इंडियानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवला होता. रोहित शर्मा आणि कंपनीची आता बांगलादेशशी टक्कर होणार आहे. शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेशनंही तीनपैकी दोन मॅचेस जिंकलेल्या आहेत.