JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / क्रिकेटपटूच्या वडिलांनी दिलंय अर्जुनला प्रशिक्षण, चॅम्पियन खेळाडू करण्याचा केला निर्धार

क्रिकेटपटूच्या वडिलांनी दिलंय अर्जुनला प्रशिक्षण, चॅम्पियन खेळाडू करण्याचा केला निर्धार

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं रणजी क्रिकेटमधील पदार्पणातच शतक झळकावलं. त्याच्या या यशात माजी क्रिकेटपटूंच्या वडिलांचा मोठा वाटा आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 डिसेंबर :  भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला ‘क्रिकेटचा देव’ म्हटलं जातं. सचिनने आपल्या कारकिर्दीमध्ये शेकडो विक्रम प्रस्थापित केले. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनेही आपल्याच पित्याच्या पावलावर पाऊल टाकून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. अर्जुन वयाच्या नवव्या वर्षापासून क्रिकेट खेळत आहे; मात्र त्याला आपल्या वडिलांप्रमाणे यश मिळालं नाही. या कारणामुळे त्याला अनेकदा टीकेचाही सामना करावा लागला; पण 14 डिसेंबर 2022 रोजी गोवा टीमकडून खेळताना त्याने रणजी पदार्पणाच्या मॅचमध्ये शतक झळकावलं. त्यामुळे सचिनने 34 वर्षांपूर्वी केलेल्या विक्रमाशी अर्जुनने बरोबरी केली. सचिनने डिसेंबर 1988 मध्ये पदार्पणाच्या रणजी मॅचमध्ये शतक केलं होतं. अर्जुनला माजी क्रिकेटपटू योगराजसिंग यांनी दिलेलं प्रशिक्षण दिलं आहे. ‘दैनिक भास्कर’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. योगराजसिंग म्हणजे धडाकेबाज क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील. रणजी सिझन सुरू होण्यापूर्वी अर्जुन त्यांच्याकडे ट्रेनिंग घेत होता. योगराजसिंग यांनी ट्रेनिंगदरम्यानच्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत. गोव्याची टीम चंडीगडच्या योगराज सिंग अकादमीत सराव करणार होती. त्यापूर्वी, सचिन आणि युवराज दोघांनीही फोन करून योगराज यांना अर्जुन तिथे येत असल्याची कल्पना दिली होती. याबाबत योगराज म्हणाले “सचिनने युवराजला लहान भावासारखी वागणूक दिली. त्यानं त्याची खूप काळजी घेतली. त्यामुळे अर्जुनला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. मी 10-12 दिवस अर्जुनला ट्रेनिंग दिलं.” द्विशतकानंतर इशानसोबत वडील बोलले नाही, काय आहे कारण? शिस्तीला पर्याय नाही योगराज सिंग यांच्या मते, सोनं आगीत टाकल्यानंतर ते आणखी चमकतं. सैन्यात कमांडोंना विशेष मानलं जातं. कारण त्यांना कठोर प्रशिक्षण दिलं जातं. कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचं असेल, तर शिस्त, निष्ठा, दृढनिश्चय आणि समर्पण आवश्यक आहे. “ज्याला आई-वडील एकटं सोडतात, ते मूल काहीही करू शकत नाहीत. युवराजला फार खडतर प्रशिक्षण दिलं. तरीदेखील तो म्हणतो, की प्रत्येक मुलाला माझ्यासारखा पिता मिळाला पाहिजे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे,” असं सिंग म्हणाले. अर्जुनला बघून युवी-सचिनची आठवण येते ‘अर्जुन आडवेतिडवे कसेही शॉट मारत होता. योगराज सिंग यांनी त्याला असे शॉट्स खेळण्यापासून रोखलं. त्याला समोर ‘व्ही’मध्ये खेळण्यास सांगितलं. जेव्हा तो पंच मारत होता तेव्हा सिंग यांना युवी आणि सचिनची आठवण आली. अर्जुन उंच आणि बलदंड शरीरयष्टीचा आहे. त्याची क्षमता वाढवण्यासाठी एका माणसाला पूर्णपणे गुंतून राहावं लागेल, असं सिंग यांना वाटतं. अर्जुनने पूर्ण केलं सचिनचं ते स्वप्न, जे राहिलं होतं अधूरं… सुजलेला पाय घेऊन बॅटिंग “प्रशिक्षणादरम्यान अर्जुनच्या घोट्याला बॉल लागला होता. त्यानं सुजलेल्या पायाला बर्फ लावला. हाड मोडलं असेल अशी भीती मला वाटत होती. मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले सर्व ठीक आहे. परत येताना अर्जुनने हॉटेलमध्ये जाण्याचा विचार केला. मी नकार दिला. त्याला चालताही येत नव्हतं तरीही मी त्याला बॅटिंग करण्यास भाग पाडलं,” अशी आठवण योगराजसिंग यांनी सांगितली. योगराजसिंग यांच्या सांगण्यावरून जखमी अर्जुन मैदानावर आला. त्यानं अर्ध्या तासात डीएव्ही महाविद्यालयात जोरदार सराव केला. चौफेर फटके मारले. काही उत्तुंग षटकारही मारले. पुन्हा घोट्याला बर्फ लावून बॉलिंगचा सराव केला योगराजसिंग यांनी अर्जुनला सांगितलं, की ‘माइंडसेट फार महत्त्वाचा आहे. हॉटेलमध्ये परत गेला असतास, तर दिवस वाया गेला असता.युवराजप्रमाणेच कडक शिस्तीत योगराजसिंग यांनी अर्जुनकडून सराव करून घेतला. गुरू उद्धटच हवा! ‘अ‍ॅरॉगंट मास्टर योगराजसिंग’ नावाचं पुस्तक प्रकाशित होत आहे. याबद्दल सिंग म्हणाले, “होय. मी उद्धट आहे. यशस्वी होण्यासाठी उद्धट योगराजसिंगची आवश्यकता आहे. मला अनेक पालकांचे फोन येतात. मी सध्या 70 वर्षांचा आहे. देवाने मला आणखी 20 वर्षं आयुष्य द्यावं, जेणेकरून मी माझ्या नातवालाही क्रिकेटर बनवू शकेन.” अर्जुनच्या शतकावर सचिनची प्रतिक्रिया, म्हणाला,‘प्रत्येक बापाला वाटत असतं की…’ सचिन-अर्जुनची तुलना नकोच “मी अर्जुनला सांगितलं, की तू सचिन तेंडुलकरचा मुलगा आहेस हे विसरून जा. तू एक स्वतंत्र व्यक्ती आहेस. तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल. मी त्याला माझ्या खोलीत घेऊन गेलो. माझ्या खोलीत सचिन आणि युवराजचे फोटो आहेत. मला तिसरा फोटो तुझाच हवा आहे, असंही त्याला सांगितलं,” असं योगराजसिंग म्हणाले. अर्जुनची सचिनशी तुलना करू नका, असं आवाहन त्यांनी क्रिकेट चाहत्यांना केलं. अर्जुन एक दिवस जगातला सर्वोत्तम बॅटर बनेल. तो ख्रिस गेलसारखा बॅटर बनेल, असं सिंग यांना वाटतं. मुंबईला जाण्याची तयारी ‘अर्जुनची बॉलिंग चांगली आहे पण, बॅटिंगमध्ये थोडी सुधारणा आवश्यक आहे. बॅटिंग करताना त्याच्या लोअर बॉडीची हालचाल व्यवस्थित होत नाही. हा दोष दूर केला तर अर्जुन खूप चांगला बॅटर होईल. याबाबत त्यांनी सचिनशी चर्चा केली आहे. गरज पडल्यास अर्जुनसाठी मुंबईला जाण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या