मुंबई, 16 डिसेंबर : प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणातच अर्जुन तेंडुलकरणे शतक झळकावलं. त्याने रणजी ट्रॉफीत गोव्याकडून खेळताना पहिल्या डावात 120 धावांची खेळी केली. या खेळीसह अर्जुनने वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली होती. सचिननेसुद्धा 1988 मध्ये रणजी पदार्पणात शतक केलं होतं. मुलाच्या या कामगिरीवर आता सचिनने प्रतिक्रिया दिली असून ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. एका कार्यक्रमात सचिनने स्वत:च्या पदार्पणातील शतकाचा आणि वडिल रमेश तेंडुलकर यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला. सचिन म्हणाला की, मला आजही आठवतं की माझे क्रिकेटचे सुरुवातीचे दिवस होते तेव्हा माझ्या बाबांना कुणीतरी सचिनचे वडील म्हणून हाक मारली होती. तेव्हा माझ्या वडिलांच्या मित्रांनी त्यांना विचारलं की तुम्हाला कसं वाटतंय? तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की आय़ुष्यातला सर्वात गौरवास्पद असा क्षण आहे. प्रत्येक बापाला वाटतं की, त्यांना मुलाच्या कामामुळे ओळखलं जावं. हेही वाचा : रोनाल्डोला बेंचवर बसवलेल्या पोर्तुगालच्या प्रशिक्षकांचा राजीनामा, FPFने दिली माहिती सचिनने म्हटलं की एका क्रिकेटपटूचा मुलगा असल्यानं जास्तीचा दबाव असतो. आधीही आवाहन केलंय की अर्जुनची माझ्याशी तुलना करू नका. माझ्या पालकांनी कधी माझ्यावर दबाव टाकला नव्हता. अर्जुनला सध्या त्याचा खेळ खेळू दे. त्याच्या कामगिरीनंतर काही बोलणं योग्य होईल. सचिनने म्हटलं की, पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी माझं बोलणं झालं होतं. मी त्याला शतकासाठी खेळायला सांगितलं होतं. पहिल्या दिवशी तो 4 धावांवर नाबाद राहिला. त्याने विचारलं की, संघासाठी किती धावा ठीक असतील. मी त्याला किमान 375 धावा सांगितल्या होत्या. अर्जुनने म्हटलं की, तुम्ही खात्रीने सांगू शकता? तेव्हा मी म्हटलं की, हो, तुला शतक करण्याची गरज आहे. तुला विश्वास आहे का तू शतक करू शकतोस? असा प्रश्नही विचारला होता. हेही वाचा : VIDEO : सिराजचं बोलणं लिटन दासला झोंबलं, विराटनेही डिवचलं; नेमकं काय घडलं? गोव्याने पहिल्या दिवशी 5 बाद 210 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुनने पहिल्या डावात 207 चेंडू खेळताना 120 धावा केल्या. यात त्याने 16 चौकार आणि 2 षटकार मारले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.