जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / द्विशतकानंतर इशानसोबत वडील बोलले नाही, काय आहे कारण?

द्विशतकानंतर इशानसोबत वडील बोलले नाही, काय आहे कारण?

द्विशतकानंतर इशानसोबत वडील बोलले नाही, काय आहे कारण?

चांगली कामगिरी केल्यानतंर वडील त्याच्याशी बोलले नाहीत असं काही पहिल्यांदाच झालं नाही की. इशान किशन जेव्हा जेव्हा चांगली कामगिरी करतो तेव्हा त्याचे वडील असेच वागतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 डिसेंबर :  भारताचा स्टार क्रिकेटपटू इशान किशनने बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावलं होतं. या शतकानंतर त्याचे वडील प्रणव कुमार पांडे हे त्याच्याशी बोलले नाहीत. चांगली कामगिरी केल्यानतंर वडील त्याच्याशी बोलले नाहीत असं काही पहिल्यांदाच झालं नाही की. इशान किशन जेव्हा जेव्हा चांगली कामगिरी करतो तेव्हा त्याचे वडील असेच वागतात. प्रणव कुमार पांडे यांनी आपल्या या वागण्याबाबत खुलासा केला आहे. इशान किशनच्या डोक्यात यशाची हवा जाऊ नये असं त्याच्या वडिलांना वाटतं. प्रणव कुमार पांडे यांनी म्हटलं की, जेव्हा शतक मारतो तेव्हा मी बोलत नाही. सगळं जग कौतुक करत असतं. त्याने सामना झाल्यावर मला फोन केला आणि मी त्याला म्हटलं तु पुढच्या सामन्यातून पुन्हा शून्यापासून सुरुवात करशील. या द्विशतकाची हवा डोक्यात जाऊ देऊ नको. हेही वाचा :  रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत खेळणार का? दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर इशान किशन टी२० वर्ल्ड कपमध्ये निवड न झाल्यानं खूप निराश झाला होता. तेव्हा तणावात होता आणि मी त्याला असं कधी पाहिलं नव्हतं. दंगामस्ती करणारा तो मुलगा आहे पण जेव्हा त्याची निवड झाली नाही तेव्हा निराश होता. घरात त्याला झोप यायची नाही, रात्री छतावर फिरत बसायचा असंही प्रणव पांडे यांनी सांगितलं. इशान निराश होतो तेव्हा त्याच्यासोबत बोललो आणि निराश वाटून घेऊ नको असं सांगितलं. आता तुला संघातून वगळण्यासाठी त्यांना कोणतं कारण मिळणार नाही असं खेळ. तुझ्या बॅटमधून आणि खेळातून बोल. तू आता तरुण आहेस, पुढच्या वर्षी एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप आहे आणि त्याची तयारी कर आणि संधीचं सोनं कर असं सांगितल्याचं प्रणव पांडे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात