JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, पाकिस्तानचा मार्ग साफ; वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर

T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, पाकिस्तानचा मार्ग साफ; वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर

T20 World Cup: रविवारी सकाळी विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला सर्वात मोठा धक्का बसला. नेदरलँडनं दक्षिण आफ्रकेला 13 धावांनी हरवून एक मोठा उलटफेर केला.

जाहिरात

दक्षिण आफ्रिका वि. नेदरलँड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अ‍ॅडलेड, 06 नोव्हेंबर: यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये धक्कादायक निकालांची मालिका सुरुच आहे. रविवारी सकाळी विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला सर्वात मोठा धक्का बसला. नेदरलँडनं दक्षिण आफ्रकेला 13 धावांनी हरवून एक मोठा उलटफेर केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं टी20 वर्ल्ड कपमधलं आव्हान तर संपुष्टात आलंच पण पाकिस्तान आणि बांगलादेश संघांना संधी निर्माण झाली आहे. तर टीम इंडिया सेमी फायनलसाठी पात्र ठरली आहे. या सामन्यात नेदरलँडनं दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानासमोर दक्षिण आफ्रिकन फलंदाजी ढेपाळली आणि त्यांचा सेमी फायनलचा मार्गही बंद झाला. नेदरलँडचा यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमधल्या सुपर 12 फेरीतला हा दुसरा विजय ठरला. याआधी नेदरलँडनं झिम्बाब्वेला हरवलं होतं.

संबंधित बातम्या

टीम इंडिया सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म झालं आहे. दक्षिण आफ्रिका या सामन्याआधी 5 पॉईंटसह पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या नंबरवर होती. तर टीम इंडिया 6 पॉईंटसह पहिल्या नंबरवर. त्यामुळे टीम इंडिया थेट सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. पण तिसऱ्या आणि चौथ्या नंबरवर असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश संघांचे 4-4 पॉईंट्स आहेत. त्यामुळे या दोन्ही संघातला विजेता संघ आता सेमी फायनल गाठणार आहे. हेही वाचा -  SMAT20: अखेर करुन दाखवलं… अजिंक्य रहाणेच्या मुंबईनं 13 वर्षांनी पूर्ण केलं ‘ते’ स्वप्न पाकिस्तानला पुन्हा संधी या स्पर्धेत आधी टीम इंडिया आणि त्यानंतर झिम्बाब्वेसारख्या संघांकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेनं आणखी एक संधी निर्माण करुन दिली आहे. कारण बांगलादेशविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी क्वार्टर फायनलचा सामना ठरणार आहे. पण टीम इंडियाला सुपर 12 फेरीतील शेवटचा सामना खेळण्याआधीच सेमी फायनलचं तिकीट मिळाल्यानं मेलबर्नमध्ये रोहित शर्माचा भारतीय संघ निर्धास्तपणे मैदानात उतरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या