कोलकाता, 05 नोव्हेंबर: डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईकरांचा चांगलाच दबदबा आहे. रणजी ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत तर मुंबईच्या जवळपासही कुणी नाही. मुंबईनं तब्बल 41 वेळा रणजी ट्रॉफी उंचावली आहे. इराणी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि इतर देशांतर्गत स्पर्धांमध्ये मुंबईचं नाणं नेहमीच खणखणीत वाजलंय. पण एका स्पर्धेत मात्र मुंबईकरांना विजेतेपद सारखी हुलकावणी देत होतं. ती होती सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धा. पण यंदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईच्या टीमनं ती ट्रॉफीही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या खजिन्यात जमा केली आहे.
𝗧𝗵𝗮𝘁 𝗪𝗶𝗻𝗻𝗶𝗻𝗴 𝗙𝗲𝗲𝗹𝗶𝗻𝗴! 🙌 🙌
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 5, 2022
Celebrations begin as the @ajinkyarahane88-led Mumbai lift their maiden #SyedMushtaqAliT20 title. 🏆 👏
Scorecard 👉 https://t.co/VajdciaA1p#HPvMUM | #Final | @MumbaiCricAssoc | @mastercardindia pic.twitter.com/D4HH8aakmB
मुंबईकडे मुश्ताक अली ट्रॉफी 2009 पासून आतापर्यंत मुंबईला एकदाही मुश्ताक अली टी20 स्पर्धा जिंकता आली नव्हती. पण यंदा एमसीएनं अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात एक तगडा संघ मैदानात उतरवला. या टीममध्ये कॅप्टन रहाणेसह पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शिवम दुबे हे आंतरराष्ट्रीय खेळाडू तर त्यांच्या जोडीला युवा यशस्वी जैसवाल, सरफराज खान, शम्स मुलानीसारख्या युवा खेळाडूंचा समावेश होता. एकेक करत रहाणेच्या या पलटननं मुश्ताक अली टी20 स्पर्धेची फायनल गाठली कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर हिमाचल प्रदेशला 3 विकेट्सनी हरवून विजेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरलं.
𝐂. 𝐇. 𝐀. 𝐌. 𝐏. 𝐈. 𝐎. 𝐍. 𝐒! 🏆 🙌
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 5, 2022
Say hello to the new #SyedMushtaqAliT20 winners - Mumbai! 👋
Scorecard 👉 https://t.co/VajdciaA1p#HPvMUM | #Final | @MumbaiCricAssoc | @mastercardindia pic.twitter.com/gx1KN9aNyP
हेही वाचा - Ind vs Zim: ‘सुपर संडे’ला पहाटे 5.30 पासून सामने, भारत-झिम्बाब्वे मॅच ‘या’ वेळेत होणार सुरु हिमाचलवर सनसनाटी मात अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या फायनलमध्ये हिमाचलनं मुंबईला विजयासाठी चांगलच झुंजवलं. ऋषी धवनच्या हिमाचलनं या सामन्यात मुंबईसमोर 144 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण तगडी फलंदाजी असतानाही मुंबईला विजयासाठी झुंजावं लागलं. श्रेयस अय्यरनं 34 धावा केल्या तर सरफराजनं 36 धावांची खेळी करत मुंबईला विजेतेपदाचं दार उघडून दिलं. मुंबईनं हा सामना 3 विकेट्सनी जिंकून एक नवा इतिहास घडवला.