JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs Aus: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; नेट्समध्ये ‘या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजाची तुफान फटकेबाजी, पाहा Video

Ind vs Aus: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; नेट्समध्ये ‘या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजाची तुफान फटकेबाजी, पाहा Video

Ind vs Aus: भारताविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेआधी कांगारुंच्या संघातील एक फलंदाज नेट्समध्ये आक्रमक फटकेबाजी करताना दिसला. याचा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियानं नुकताच सोशल मीडियात शेअर केला आहे.

जाहिरात

टिम डेव्हिड नेट्समध्ये सराव करताना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मोहाली**, 18** सप्टेंबर**:** भारत दौऱ्यावर आलेला ऑस्ट्रेलियन संघ यजमान टीम इंडियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. मोहालीत होणाऱ्या मालिकेतील पहिल्या टी20 आधी ऑस्ट्रेलियन संघानं कालपासूनच सरावाला सुरुवात केली. कर्णधार फिंचसह स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड यांनी कसून सराव केला. पण कांगारुंच्या संघातील एक फलंदाज मात्र नेट्समध्ये आक्रमक फटकेबाजी करताना दिसला. या फलंदाजाचा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियानं नुकताच सोशल मीडियात शेअर केला आहे. टिम डेव्हिडची जोरदार फटकेबाजी ऑस्ट्रेलियन संघात पहिल्यांदाच स्थान मिळालेल्या टिम डेव्हिडनं पहिल्या टी20आधी नेट्समध्ये जोरदार सराव केला. डेव्हिडनं प्रॅक्टिस सेशनदरम्यान केवळ मोठमोठ्या फटके खेळले. यावरुन मधल्या फळीत खेळणाऱ्या डेव्हिडला ऑस्ट्रेलियानं हाणामारीच्या षटकांसाठी एक बिग हिटर म्हणून संघात घेतल्याचं स्पष्ट होतं. हेही वाचा -   Ind vs Aus: शमीच्या जागी उमेश यादवचीच निवड का झाली? रोहितनं दिलं हे उत्तर… टिम डेव्हिडनं याआधी सिंगापूरकडून 14 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याच्याकडे सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया अशा दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी डेव्हिड आता ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करणार आहे.

संबंधित बातम्या

डेव्हिडचं टी20 करियर टिम डेव्हिडनं गेल्या दोन वर्षात 86 टी20 सामने खेळले आहेत. त्यात त्यानं 1874 धावा ठोकल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे 16 ते 20 या ओव्हर्समध्ये त्याचा स्ट्राईक रेट 200 च्या वर आहे. आयपीएलमध्येही त्यानं 9 सामन्यात 210 च्या स्ट्राईक रेटनं 187 धावा फटकावल्या आहेत. त्यामुळे आगामी टी20 मालिकेसह वर्ल्ड कपमध्येही टिम डेव्हिड प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक ठरु शकतो. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचं वेळापत्रक 20 सप्टेंबर, पहिला टी20 सामना – मोहाली 23 सप्टेंबर, दुसरा टी20 सामना – नागपूर 25 सप्टेंबर, तिसरा टी20 सामना – हैदराबाद हेही वाचा -  T20 World Cup: राहुल नव्हे तर वर्ल्ड कपला ‘हा’ असणार रोहितचा जोडीदार? ओपनिंगवरुन रोहितचं मोठं विधान

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेट कीपर), दिनेश कार्तिक (विकेट कीपर), हार्दिक पंड्या, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलियन संघ- फिंच (कर्णधार), अबॉट,  अॅगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरुन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, झॅम्पा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या